त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप

By सचिन सागरे | Published: March 3, 2024 08:03 PM2024-03-03T20:03:32+5:302024-03-03T20:03:51+5:30

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगितले. 

Finale of the Tri Level Trilingual Essay Competition | त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप

त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप

कल्याण : बी.  के. बिर्ला कॉलेज, कल्याण आणि अखिल भारतीय साहित्य परिषद (कल्याण युनिट) यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक प्रतिभा संशोधन निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निबंध स्पर्धेत 650 हून अधिक निबंध प्राप्त झाले, त्यापैकी एकूण 27 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले व इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगितले. 

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र पाठक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. साहित्यिकांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांवर त्यांनी संक्षिप्त भाष्य केले. प्रमुख पाहुणे दुर्गेश सोनार, अभासापचे अध्यक्ष, कोकण प्रांत, यांनी विद्यार्थ्यांना निरोगी लेखनाची सुरुवात करण्याचे सांगितले व लेखनाची उपयुक्तता सांगून लेखनाबाबत प्रबोधन केले.  विशेष अतिथी प्रवीण देशमुख यांनी साहित्य परिषदेची उद्दिष्टे अधोरेखित करताना संयुक्त कुटुंबांचे महत्त्व सांगितले. संजय द्विवेदी यांनी या निबंध स्पर्धेचे महत्त्व आणि त्यासाठी निर्धारित केलेले विषय अधोरेखित केले.  कार्यक्रमाचे संचालन परिषदेच्या कल्याण  युनिटचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्यामसुंदर पांडे आणि परिषदेच्या सचिव सुश्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. डॉ. बालकवी सुरंजे यांनी पाहुण्यांचा परिचय व राम स्वरूप साहू यांनी सरस्वती वंदना तर विधी यांनी पाहुण्यांचे स्वागत गीत सादर केले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालय या तिन्ही स्तरांवर हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सत्कार समारंभात सुमारे तीनशे विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. ज्यामध्ये एन.आर.सी शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता, होली क्रॉस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदा नाईक, शशिकला जैस्वाल, अंजू मेहता, अर्चना सिंग, संतोष शर्मा, जगत नारायण उपाध्याय, नरेंद्र तिवारी, अखिलेश जैसल, पूनम जयसवार नम्रता सिंग, भूषण निकम, ज्योती थोड़ात, रूबी दुबे, सुष्मिता सिंह, सुमिता आणि प्रांशी आदि शिक्षक मुख्य होते.

Web Title: Finale of the Tri Level Trilingual Essay Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण