अखेर महापालिकेने केले जाहिर , त्या स्फोटाच्या दुर्घटनेत ११ मयतच ६८ जखमी ५७ जणांना सोडले घरी ५ अतिदक्षता विभागात तर ६ जनरल वॉर्ड मध्ये
By अनिकेत घमंडी | Published: May 27, 2024 06:21 PM2024-05-27T18:21:59+5:302024-05-27T18:22:27+5:30
मात्र गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राईम ब्रॅंचने जाहीर।केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १३ जणांचे मृतदेह मिळाल्याचे म्हंटले होते. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा काही ताळमेळ लागत नसून यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
डोंबिवली: येथील एमआयडीसी परिसरात अमुदान कंपनीत झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणि विविध रुग्णालयात दाखल झालेल्या ६८जखमी पैकी ५७ जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, उर्वरित ११रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत, त्यापैकी ५ रुग्ण अतिदक्षता विभागात आणि ६ रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये दाखल आहेत. आत्तापर्यंत ११ मृतदेह सापडले असून त्यातील ३ मृतदेहाची ओळख पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती महापालिकेने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर।केली. याव्यतिरिक्त आता पर्यंत आढळून आलेल्या काही शरीराच्या भागांचे डीएनए सॅम्पल घेणे इ. कार्यवाही करण्यात येत आहे.यापूर्वी घेण्यात आलेले सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.आजही महापालिकेचे अग्निशमन पथक आणि इतर अधिकारी व कर्मचारी पथक, एमयडीसीचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळावर हजर असून दुर्घटना स्थळावरील मलबा उचलण्याचे काम अजूनही सुरु आहे.
मात्र गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राईम ब्रॅंचने जाहीर।केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १३ जणांचे मृतदेह मिळाल्याचे म्हंटले होते. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा काही ताळमेळ लागत नसून यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
एसीपी सुनील।कुराडे यांनी माध्यमांना सांगितले की १२ जण मिसींग असल्याची माहिती त्यांना आजूबाजूच्या।कंपन्यामध्ये माहिती घेतली असता समजले. त्यामुळे जर एवढी संख्या असेल तर मात्र मृतांचा आकडा वाढणार असल्याची चिंता दक्ष नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे शोधकार्य वेगाने व्हायला हवे आणि जास्त टीम लावणे गरजेचे आहे, आता मलबा देखील हलवण्यात येणार असल्याने समस्येत आणखी वाढ होईल असेही नागरिक सांगतात.