अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एसी लोकल ट्रेनने केला घाटकोपर ते कल्याण प्रवास
By अनिकेत घमंडी | Published: February 24, 2024 08:43 PM2024-02-24T20:43:47+5:302024-02-24T20:44:40+5:30
घाटकोपर ते कल्याण एसी आणि परतीचा प्रवास मुंबई उपनगरी लोकल ट्रेनने केला.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: कनेक्टिव्हिटी आणि लोककेंद्रित प्रशासनाचे उल्लेखनीय प्रदर्शन करताना, माननीय अर्थमंत्री, श्रीमती निर्मला सीतारमण, शनिवारी घाटकोपर ते कल्याण एसी आणि परतीचा प्रवास मुंबई उपनगरी लोकल ट्रेनने केला.
अर्थमंत्री दुपारी १२.४२ वाजता घाटकोपर ते कल्याण या प्रवासासाठी बदलापूर वातानुकूलित जलद लोकलमध्ये चढल्या. नंतर, परतीच्या प्रवासासाठी, त्यांनी कल्याण येथून सायंकाळी ५.३९ वाजता सुटणारी जलद नॉन-एसी ट्रेन निवडली. त्यांच्या प्रवासादरम्यान सीतारमण, विनम्रता आणि सुलभता दाखवली. त्यावेळी सामान्य लोकांशी व सहप्रवाशांसोबत चर्चा केली. त्यांनी स्टेशन कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याचा मंत्र्यांचा निर्णय केवळ सार्वजनिक वाहतूक आणि मुंबई लोकल ट्रेन्सच्या विश्वासार्हतेबद्दल सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत नाही तर दररोजच्या प्रवाशांची आव्हाने आणि अनुभव प्रत्यक्षपणे अनुभवण्यासाठी आपले समर्पण देखील दर्शवल्याचे सांगण्यात आले.