बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिला वनखात्याकडून सव्वा लाखाची आर्थिक मदत
By मुरलीधर भवार | Published: February 24, 2023 06:33 PM2023-02-24T18:33:24+5:302023-02-24T18:33:58+5:30
चार महिन्यापूर्वी शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा राेड परिसरात एका बिबट्याने शिरकाव केला हाेता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मनाेहर गायकवाड हे जखमी झाले हाेते.
कल्याण-चार महिन्यापूर्वी शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा राेड परिसरात एका बिबट्याने शिरकाव केला हाेता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मनाेहर गायकवाड हे जखमी झाले हाेते. त्यांना वन खात्याकडून १ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी मनाेहर गायकवाड यांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला हाेता. त्यांनी हा विषय कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मांडला हाेता. खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मना्ेहर गायकवाड यांना सव्वा लाखाची मदत मिळाली आहे. वनखात्याने दिलेल्या मदतीचा धनादेश खासदारांच्या उपस्थितीत मनाेहर गायकवाड यांना काल सूपू्र्द केला. यावेळी वनखात्याचे अधिकारीही उपस्थित हाेते.
वन्य हिंस्त्र प्राण्यांपासून नागरीकांचे संरक्षण करणे ही वन विभागाची नैतिक जबाबदारी आहे . परंतु या जबाबदारीत कसूर झाल्यानेच बिबट्याने नागरी वस्तीत प्रवेश करून अनेक नागरीकांना जखमी केल्याची बाब वन विभाग अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा परिणाम म्हणून सदरची मदत देण्यास वन विभागाने दिली असल्याचे सांगण्यात आले.