एकल प्लास्टिक वापरकर्त्यांकडून केला १५ हजार रुपयांचा दंड वसूल; केडीएमसी उपायुक्तांची कारवाई

By प्रशांत माने | Published: September 11, 2022 09:40 PM2022-09-11T21:40:49+5:302022-09-11T21:41:35+5:30

उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक आणि  व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांचेकडून एकूण १ हजार ३०० रुपये इतका दंड वसूल केला.

fine of rs 15 thousand was collected from single plastic users action of kdmc deputy commissioner | एकल प्लास्टिक वापरकर्त्यांकडून केला १५ हजार रुपयांचा दंड वसूल; केडीएमसी उपायुक्तांची कारवाई

एकल प्लास्टिक वापरकर्त्यांकडून केला १५ हजार रुपयांचा दंड वसूल; केडीएमसी उपायुक्तांची कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याणः येथील पश्चिमेकडील ब प्रभाग क्षेत्र परिसरातील साई चौक, गोदरेज हिल ,खडकपाडा परिसर याठिकाणी केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या पथकाने आज संध्याकाळी पाहणी दौरा करत  एकल प्लास्टिक वापरणाऱ्या तीन फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून  प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक आणि  व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांचेकडून एकूण १ हजार ३०० रुपये इतका दंड वसूल केला.

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात एकल प्लास्टिक वापर व साठवणुकीवर तसेच उघड्यावर कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. एकल वापर प्लास्टिक बंदी अंतर्गत पहिल्यावेळी रुपये ५ हजार, दुसऱ्या वेळी रुपये १० हजार  व तिसऱ्या वेळी रुपये २५०००  इतकी दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी दंडात्मक तरतूद आहे, त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: fine of rs 15 thousand was collected from single plastic users action of kdmc deputy commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.