केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पास आग

By मुरलीधर भवार | Published: May 13, 2023 05:58 PM2023-05-13T17:58:23+5:302023-05-13T17:58:31+5:30

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे कचरा प्रकल्पातील कचऱ््याला आज दुपारी दोन वाजता अनाचक आग लागल्याची घटना घडली. वारा जास्त असल्याने ...

Fire at KDMC's Umbarde waste plant | केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पास आग

केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पास आग

googlenewsNext

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे कचरा प्रकल्पातील कचऱ््याला आज दुपारी दोन वाजता अनाचक आग लागल्याची घटना घडली. वारा जास्त असल्याने आग पसरत हाेती. आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पोहचल्या.

आग विझविण्यात अग्नीशमन दलास अडचण येत होती. वाऱ््यामुळे आग आणखीन वाढत हाेती. जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलास यश आले. ही आग पूर्णपणे विझविण्याकरीता संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रयत्न सुरु होते. उंबर्डे प्रकल्पात कचऱ््यापासून खत निर्मिती केली जाते. सुका कचरा त्याठिकाणी साठविला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेसाठी असलेल्या कचऱ््याला दुपारी आग लागल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी भर उन्हात धुराचे साम्राज्य पसरले. कामगारांच्या नाका तोंडात धूर गेला. उंबर्डे परिसर धूरमय झाला होता.

उंबर्डे प्रकल्पास स्थानिक नागरीकांचा विरोध आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरातील कचरा प्रक्रियेसाठी न आणता प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कचरा प्रकल्प उभारले जावेत. यापूर्वीही उंबर्डे प्रकल्पास आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात किमान चार वेळा तरी या प्रकल्पातील कचऱ््याला आग लागली आहे. कचऱ््याला कोणी आग लावते की, उन्हामुळे कचरा स्वत: पेट घेतो याचा शोध घेणे महत्वाचे ठरणार आहे. आगीच्या घटना वारंवार होत असताना महापालिकेच्या घनकचार व्यवस्थापन विभागाकडून आग लागू नये यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Fire at KDMC's Umbarde waste plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.