वरळी, ठाणे की कल्याण कुठून उभं राहायचे ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

By मुरलीधर भवार | Published: December 18, 2023 04:01 PM2023-12-18T16:01:00+5:302023-12-18T16:01:31+5:30

डोंबिवलीत आगरी युथ फोरम तर्फे आयोजित आगरी महोत्सव दरम्यान खासदार शिंदे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर उपरोक्त आव्हान ठाकरे यांना दिले आहे.

'First decide where to stand from Worli, Thane or Kalyan'; Srikant Shinde's challenge to Aditya Thackeray | वरळी, ठाणे की कल्याण कुठून उभं राहायचे ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

वरळी, ठाणे की कल्याण कुठून उभं राहायचे ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

कल्याण-आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत अशी चर्चा सुरु असल्याने कल्याणचे
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, वरळी, ठाणे की कल्याण कुठून उभे राहायचे हे आधी त्यांनी ठरावावे असे आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

डोंबिवलीत आगरी युथ फोरम तर्फे आयोजित आगरी महोत्सव दरम्यान खासदार शिंदे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर उपरोक्त आव्हान ठाकरे यांना दिले आहे. या प्रसंगी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे याांच्यासह कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम , ठाणे माजी महापा्ैर रमाकांत मढवी, पदाधिकारी सागर जेधे, संतोष चव्हाण, सागर दुबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईची साफसफाई केली

खासदार शिंदे यांनी सांगितले की मला वाटते, स्वप्न बघण्यामध्ये गैर नाही. ज्याला पण इकडे उभारायचे त्यांनी इकडे खुशाल उभे राहिले पाहिजे. कॉम्पिटिशन पाहिजे. त्या ठिकाणी विरोधक पण चांगला पाहिजे. तरच लढाईला त्या ठिकाणी मजा येईल. कोण कुठून उभे राहणार याविषयी रोजच विधाने करत राहायचे की इथून उभे रहायचे तिथून उभारायचे. राजकारणात अशा गोष्टी चालत नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. खासदार शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले. आज माननीय मुख्यमंत्री नागपूरला सेशन चालू असताना पहाटे सहा वाजता मुंबईमध्ये येऊन मुंबईची साफसफाई केली.

साफसफाई अनेक वर्ष झाली नव्हती. ती साफसफाई माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करताय डीप क्लिनिंग त्याला नाव दिले आहे. खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता. त्याला साफ करायची खूप गरज होती. ती साफ खाण करण्याचे काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी येऊन करतात. येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता साफसफाई मध्ये सामील होईल आणि मुंबई एकदम आणि क्लिन चकाचक होईल मुंबईमध्ये फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण होईल .लोकांना जे आवश्यक आहे ते या मुंबईमध्ये उभे राहील असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.

केलेली कामे छातीठोपणे सांगू शकतो

मनसे राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधी बद्दल सर्वसामान्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवा आहे, असे वक्तव्य करत अप्रत्यक्षरित्या खासदार शिंदे यांना लक्ष्य केले होते. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते. म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही. तर दिवसरात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केली. कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. मात्र विरोधकांची तितकी हिमत नाही कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत. विरोधकांकडे टीका करण्या शिवाय काही दुसरे काम नाही. म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही आणि माझी ती सवय नाही असा टोला खासदार यांनी अप्रत्यक्ष रित्या मनसे आमदार पाटील यांच्यासह विरोधकांना लगावला आहे.

Web Title: 'First decide where to stand from Worli, Thane or Kalyan'; Srikant Shinde's challenge to Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.