आधी माेटार सायकल चाेरी करायचे, मग त्याच माेटारसायकलवरुन लूट करायचे; दोघांना अटक
By मुरलीधर भवार | Published: April 27, 2023 07:23 PM2023-04-27T19:23:43+5:302023-04-27T19:24:28+5:30
या दाेघांच्या विराेधात कल्याण डाेंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
कल्याण - चाकूचा धाक दाखवून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दाेन सराईत चाेरट्यांना काेळसेवाडी पाेलिसांनी काल अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांनी नावे प्रदीप उर्फ साेनू लालचंद विश्वकर्मा आणि वसील अब्दुल अन्सारी अशी आहेत. या दाेघांच्या विराेधात कल्याण डाेंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
शहराच्या पूर्व भागातील मलंग राेडवर एका महिलेला चाकूचा धाक दाखवून दाेन जणांनी लूटले हाेते. त्याच्याकडील साेन्याे लाॅकेट हिसकावून पळ काढला हाेता. या प्रकरणी काेळसेवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पाेलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पाेलिस निरिक्षक हरीदास बाेचरे यांनी तपास केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने आराेपींचा शाेध घेतला. पाेलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आराेपी आंबिवली येथील बनेली परिसरात आहे. पाेलिसांनी सापळा रचून प्रदीप उर्फ लालचंद विश्वकर्मा आणि वसीम अब्दुल अन्सारी या दाेघांना अटक केली.
या दाेघांच्या विराेधात विविध पाेलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. हे दाेघेही चाेरटे चाेरी करण्याकरीता आधी माेटार सायकलची चाेरी करायचे. चाेरीच्या माेटार सायकलवरुन ते पुन्हा चाेरी करण्यासाठी जायचे. कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करुन चाकूचा धाक दाखवित त्यांचे दागिने हिसकावून पळ काढायचे. पाेलिसांनी या दाेन्ही चाेरट्यांकडून दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत.