जगभरातली मुलांसाठी प्रथमच 'ऑनलाईन बालमेळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 06:23 PM2021-01-24T18:23:20+5:302021-01-24T18:24:01+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी प्रथमच हा बालमेळा ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेतला जाणार आहे. आता जगभरातील मुलं या बालमेळ्यामधे सहभागी होऊ शकतात.
डोंबिवली - 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट’ या संस्थेमार्फत 'आविष्कार युथ फेस्टिवल - बालमेळा' चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी प्रथमच हा बालमेळा ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेतला जाणार आहे. आता जगभरातील मुलं या बालमेळ्यामधे सहभागी होऊ शकतात.
वाद्य वादन, चित्रकला, वक्तृत्त्व, एकल नृत्य, एकपात्री अभिनय, गाण्याची स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन या युथ फेस्टिवल मध्ये करण्यात आलं आहे. ह्या ऑनलाईन बालमेळ्यामधे ३१ जानेवारी http://rcdeyouthprograms. com/ या संकेत स्थळावर नाव नोंदवायचे आहे.
यावर्षी नाव नोंदणी प्रक्रियेपासून ते स्पर्धकांनी आपले सादरीकरण सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे. फक्त शेवटच्या टप्प्यात सर्वोत्तम दहा स्पर्धकांना प्रत्यक्षात परीक्षकांसमोर सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. ह्या स्पर्धा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
आविष्कार युथ फेस्टिवल - बालमेळ्याचे उदघाटन बालरोगतज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते आभासी व्यासपीठावर करण्यात आले. या बालमेळयाच्या आयोजनास 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' चे प्रेसिडेंट दिलीप काटेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर कौस्तुभ कशेळकर, प्रोजेक्ट चेअरमन राजकुमार सावरे, क्लब सेक्रेटरी अनुज यादव यांचे सहकार्य लाभले तसेच या उद्घाटनासाठी शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच रोटरी सदस्य या आभासी व्यासपीठावर उपस्थित होते. या बालमेळ्याची नाव नोंदणी, आणि स्पर्धेचे नीतीनियम खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://rcdeyouthprograms. com/ अधिक माहिती साठी संपर्क राजन सावरे 9769046102 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.