'फ्रीडम टू वाॅक' या स्पर्धेत पहिल्याच आठवडयात केडीएमसी संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:31 PM2022-01-08T18:31:24+5:302022-01-08T18:31:33+5:30

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील स्मार्ट सिटीमध्ये फ्रीडम टू वाॅक ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिल्याच आठवड्यात बाजी मारत पहिला क्रमांक पटकाविला आहे. 

In the first week of the Freedom to Walk competition KDMC topped the entire country | 'फ्रीडम टू वाॅक' या स्पर्धेत पहिल्याच आठवडयात केडीएमसी संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर

'फ्रीडम टू वाॅक' या स्पर्धेत पहिल्याच आठवडयात केडीएमसी संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर

Next

कल्याण-

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील स्मार्ट सिटीमध्ये फ्रीडम टू वाॅक ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत कल्याणडोंबिवली महापालिकेने पहिल्याच आठवड्यात बाजी मारत पहिला क्रमांक पटकाविला आहे. 

केंद्र सरकारने राबविलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटीने त्यात सहभाग घेतला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका देखील स्मार्ट सिटी प्रकल्प राबवित असल्याने महापालिकेने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या निकषांनसार 1 ते 26 जानेवारी या दरम्यान महापालिकेतील एकूण पाच सदस्यांनी यात सहभागी व्हायचे आहे. महापालिकेच्या फ्रीडम टू वाॅक या स्पर्धेत टीम लीटर म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आहेत.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त पल्लवी भागवत आणि महापालिका सचिव संजय जादव यांचा समावेश आहे. फिटनेसचे लक्ष्य डोळ्य़ासमोर ठेवून घेण्यात येणा:या स्पर्धेद्वारे जनजागृती करणो हा एक भाग आहे. आज महापालिकेच्या टीमने सकाळीच वसंत व्हॅली येथून किमान 12 किलोमीटर चालून नागरीकांना फिटनेसचे महत्व पटवून दिले. यामध्ये कल्याण रनर्स, मॉर्निग वॉक ग्रुपचे सदस्य देखील सहभागी झाले होते. त्याचबरोबर उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदार कोकरे, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, विक्री कर आयुक्त प्रमोद बच्छव, लहान मुले, माजी नगरसेवक सुनिल वायले आदी सहभागी झाले होते. आयुक्त सूर्यवंशी यांनी फिटनेससाठी नियमीत चालणो, सायकलिंक करणो अशा प्रकारच्या व्यायामाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. महापलिकेची टीम दररोज चालून फिटनेस विषयी नागरीकांमध्ये जनजागृती करीत आहे. त्याची नोंद स्त्रवा अॅपवर केली जात आहे. स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या पहिल्या आठवडय़ात महापालिका देशात प्रथम क्रमाकांवर आहे. 

Web Title: In the first week of the Freedom to Walk competition KDMC topped the entire country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.