आधी परीक्षा दिली मग थेट लग्न मंडपात पोहचली; टिटवाळ्याच्या युवतीची चर्चा
By मुरलीधर भवार | Published: April 13, 2023 07:37 PM2023-04-13T19:37:02+5:302023-04-13T19:37:20+5:30
मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या परिक्षेच्या सहाव्या सत्रातील परीक्षा तिने दिली.
कल्याण- टिटवाळा परिसरात राहणारी विद्यार्थिनी अश्विनी म्हसकर हीचे काल सायंकाळी लग्न होते. लग्नाच्या आधीतर सकाळी तिची परीक्षा होती. अश्विनी ही टिटवाळा नजीक असलेल्या गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालय महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी आहे.
या महाविद्यालयात सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या परिक्षेच्या सहाव्या सत्रातील परीक्षा तिने दिली. त्यानंतर अश्विनी लग्न मांडपात गेली. अश्वीनीची परिक्षा आणि विवाह एकाच दिवशी असल्याने तिने परिक्षेचा पेपर देण्यास प्राधान्य दिले. त्यानंतरती बाेहल्यावर चढली. विद्यार्थी दशेतील आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या अश्वीनीचे सर्वच कौतुक होत आहे. या विध्यार्थीनीचे परीक्षेप्रसंगी जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ. के. बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. तिच्या भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या. तिची परिक्षा आणि लग्न हा या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.