Ulhas River: उल्हास नदी मध्ये जिलेटीन काडतूसचा वापर करून स्फ़ोट घडवून होतेय मासेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:30 PM2022-04-19T12:30:15+5:302022-04-19T12:31:35+5:30
Ulhas River: कल्याण मुरबाड रोड उल्हासनदीच्या किनाऱ्या लगत असलेल्या म्हारळ गावातील गणराज मित्र मंडळाचा वतीने उल्हासनदी मध्ये जिलेटीन चा वापर करून म्हणजेच काडतुसचा वापर करुन स्फ़ोट घडवून मासेमारी केलें जाते असे आढळून आले.
कल्याण - कल्याण मुरबाड रोड उल्हासनदीच्या किनाऱ्या लगत असलेल्या म्हारळ गावातील गणराज मित्र मंडळाचा वतीने उल्हासनदी मध्ये जिलेटीन चा वापर करून म्हणजेच काडतुसचा वापर करुन स्फ़ोट घडवून मासेमारी केलें जाते असे आढळून आले.
उल्हासनदी बचाव कृती समितीला खांद्याला खांदा लावून आता गणराज मित्र मंडळाचे सभासद आपल्या उमाईसाठी सरसावले आहेत. याच गणराज मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाचा काळात नदी प्रदूषणा मुक्त होवी या साठी एक छोटासा प्रयत्न केला होता. जे गणेश भक्त गणपतीला नारळ,हार, फूल इतर पूजा समोग्री अर्पण करतात त्यांनी नारळ,हार फुल अर्पण न करता एक वही पेन अर्पण करावे असे आवाहन केले होते आणि हे सर्व साहित्य जवळ पास 100 गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या मुळे नदी मध्ये जाणारे निर्माल्याचे प्रमाण कमी होईल असा असा प्रामाणिक प्रयत्न गणराज मित्र मंडळाचा वतीने करण्यात आला होता.
आता उल्हास नदी मध्ये काही वर्षा पासून जिलेटीन चा वापर करून मासेमारी केली जाते. या मुळे नदी मधील सूक्ष्मजीव आणि अनेक मासे मृत्युमुखी पडतात. याची खंत अनेक पर्यावरण प्रेमीना वाटते. पण हे जिलेटीन देणारे आहेत तरी कोण? या उल्हासनदीच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता गणराज मित्र मंडळाचा वतीने रोख रक्कम 10 हजाराचे बक्षीस ठेवले गेले आहेत. जो कोणी जिलेटीन (काडतूस) चा वापर करून स्फ़ोट घडवुन मासेमारी करताना दिसल्यास जो कोणी व्हिडिओ क्लिप कडून खालील दिलेल्या नाव आणि मोबाईल नंबर व्हॉट्सॲप करा जो कोणी व्हिडिओ क्लिप देणार असेल त्यांचे नाव गुपित ठेवले जाईल. असे आवाहन गणराज मित्र मंडळाचे अध्यक्ष नितेश सिंग सचिव कुणाल खताते सभासद रमेश मुदनल व मिशन माय म्हारळचे निकेत सखाराम व्यवहारे च्या वतीने करण्यात आले आहे.