पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन; भाजपाचा इशारा
By अनिकेत घमंडी | Published: November 24, 2022 04:16 PM2022-11-24T16:16:46+5:302022-11-24T16:17:46+5:30
पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रारकेली आहे.
डोंबिवली: २७ गावात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून दिवाळी दरम्यान केवळ कागदावर पाणी वाढले पण प्रत्यक्षात मात्र नेत्यांच्या अन नागरिकांच्या तोंडचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पळवले असल्याची टीका भाजप डोंबिवली ग्रामीण पदाधिकारी नंदू परब यांनी।केली. पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीतर मात्र एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिली.
कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपने २७ गावात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बद्दल एमआयडीसी अधिकार्यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. पाणी नाही म्हणून नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेला आहे त्याची जाण ठेवा, जे सुरू आहे ते योग्य नाही, राजकारण पाण्याचे करू नका असे मत माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर म्हणाले. नागरिकांना पाणी ही मूलभुत गरज असून ते द्यायलाच हवे असेही ते म्हणाले. मनपाने कर भरला नाही भरला ही काहीही तांत्रिक कारण सांगू नका, असेही ते म्हणाले.
पाणी हक्क असून तो सगळ्याना मिळायला हवा , पाऊस भरपूर झाला आहे, धरण भरलेली आहेत, जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता सर्वत्र पाणी मिळते असे असताना २७ गाव पाण्यापासून वंचित ठेवू नका असे मत भाजपचे पदाधिकारी अमर माळी यांनी व्यक्त।केले. महिलांच्या समस्या जाणून घ्या, जरा गावागावात फिरा, एसी दालनात बसून त्या समस्या सुटणार नाहीत, कळणार नाहीत. आबालवृद्ध नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत, जरा डोकं ठिकाणावर ठेवून प्रामाणिक काम करा, इथे यायच म्हंटल तरी बंधन असतात, नागरिकांसाठी कार्यालय बनवलं असून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थाम्बवा अन्यथा आंदोलन करावेच लागेल असा इशारा महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे यांनी दिला.
नागरिक शांत आहेत याचा फायदा घेऊ नका, कळशी हंडा आंदोलन केले ना तर मात्र त्याला अधिकारी जबाबदार असतील असेही सगळ्यानी स्पष्ट केले. पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रार।केली आहे. पाणी नाही, रस्ते नाही, कचऱ्याची समस्या आहेच मग या ठिकाणी मिळते काय? केवळ धूळधाण का असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना।केला. पीएमओला पत्र, तक्रार पाठवून काही फरक पडतो का ते बघायचे असा सवाल त्यांनी केला. त्या परिसरात आठवडा भरापासून पाण्याची समस्या वाढली असून मनपाकडे तक्रारी करून हैराण झाल्याने पीएमओ कार्यालयाकडे दाद मगितल्याचे त्यांनी सांगितले.