सम्राट अशोक विद्यालयात सफाई कामगार चंद्रा रायर यांच्या हस्ते ध्वजारोहण
By मुरलीधर भवार | Published: January 26, 2024 02:56 PM2024-01-26T14:56:57+5:302024-01-26T14:57:11+5:30
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कामगार चंद्रा रायर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कल्याण - भारतीय संविधान महत्त्वपूर्ण असून संविधानाने दिलेल्या हक्कामुळे आपण शिक्षण घेत आहोत. शिक्षण ही यशाची पहिली पायरी नसून तो आपला पाया भक्कम असेल तरच जीवनात यश मिळवता येते. असे प्रजासत्ताक दिनी कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात वास्तु विशारद शुभम गायकवाड यांनी आपले विचार मांडले.
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, सेंट वाय. सी. इंग्लिश स्कूल, सम्राट अशोक इंग्लिश स्कूल व विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कामगार चंद्रा रायर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चंद्रा रायर यांच्यासह सफाई कामगार राजेंद्र मुट्टू स्वामी, सिंधुबाई खेडकर, कृष्णा चव्हाण, विनोद भारीया, भाऊसाहेब वाघमारे यांचा स्वच्छता दूत म्हणून पाहुण्यांच्या हस्ते कपड्यांच्या स्वरूपात भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
इयत्ता नववी एमसीसी विद्यार्थ्यांनी कवायत संचलनातून झेंड्याला सलामी दिली.क्रांतिकारक महापुरुषांच्या वेशभूषेतील लहान विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण होते. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर वास्तु विशारद शुभम गायकवाड यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय,सचिव गौतमी धनंजय,मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, सुजाता नलावडे,पंकज दुर्वे ,पालक प्रतिनिधी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षक गणेश पाटील यांनी केले. परिसरात प्रभात फेरी काढून कार्यक्रमाचा समारोप झाला.