उडणारे ड्रोन आणि हेलिकॉप्टर बनले विद्यार्थ्यांचे आकर्षण; शिवाई बालक मंदिर शाळेचा उपक्रम
By अनिकेत घमंडी | Published: February 2, 2023 06:05 PM2023-02-02T18:05:30+5:302023-02-02T18:05:56+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करियरच्या विविध संधी विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी गुरुवार ते शनिवारपर्यन्त शिवाई बालक मंदिर ट्रस्ट संचालित शिवाई बालक मंदिर शाळेने प्रदर्शन विमानतळाच्या संपूर्ण प्रतिकृतीसह इयत्ता ६ वी ते १० वी च्या मुलांकरिता आयोजित केले आहे.
डोंबिवली: आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करियरच्या विविध संधी विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी गुरुवार ते शनिवारपर्यन्त शिवाई बालक मंदिर ट्रस्ट संचालित शिवाई बालक मंदिर शाळेने प्रदर्शन विमानतळाच्या संपूर्ण प्रतिकृतीसह इयत्ता ६ वी ते १० वी च्या मुलांकरिता आयोजित केले आहे. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी पायलट अजिंक्य जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
पायलट जोशी यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करिअरच्या विविध संधींविषयी माहिती देऊन उत्तम मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासंबंधित सल्ला दिला. वेगवान गतीने विकसित होत असलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राबाबत माहिती घेण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ इतर शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शिवाई बालक मंदिर ट्रस्टने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ३० वर्षे विविध स्पर्धा, प्रदर्शन व उपक्रमांचे आयोजन शाळेमध्ये केले जाते असेही सांगण्यात आले. त्यावेळी शालेय विश्वस्त मंडळाच्या कोषाध्यक्षा ॲड. शिल्पा भागवत, कार्यवाह अरुंधती सहस्त्रबुद्धे तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मिताली इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.