अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न

By मुरलीधर भवार | Published: November 6, 2023 01:13 PM2023-11-06T13:13:33+5:302023-11-06T13:14:13+5:30

मुलीच्या मृत्यूनंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला; काळे फासत नातेवाईकांना दिला चांगलाच चोप, पोलिस तपास सुरु

forced marriage of minor girl | अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न

मुरलीधर भवार-कल्याण: एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरात फासी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, ही मुलगी तीन महिन्यापासून मिसिंग होती. तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले गेले. तिला सातत्याने ब्लॅकमेल करण्यात आले. नंतर तिची हत्या करण्यात आली. रुक्मीणीबाई रुग्णालयात मुलीचा मृतदेह आला असता मुलीच्या नातेवाईकांनी लग्न झालेल्या मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना चांगलाच चोप देत मुलालाच्या तोंडाला काळे फासले. या प्रकरणाचा तपास आता टिटवाळा पोलिस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पुणे येथील निगडी परिसरात राहणारे राजेंद्र रणदिवे यांची अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यापूर्वी अचानक बेपत्ता झाली. कल्याण पश्चिमेतली गाळेगाव परिसरात राहणाऱ्या रोहन सोबत रोहनच्या नातेवआईकांनी तिचे लग्न लावून दिले होेते. एकतर या मुलीला पळविण्यात आले. दुसरीकडे लग्न लावून दिले. मुलीचे वडील राजेंद्र रणदिवे याचा स्पष्ट आरोप आहे की, त्यांच्या मुलीला या लोकानी कोंडून ठेवले. तिचे जबरदस्तीने लग्न लावले. तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिने मला संपर्क साधला होता. की, बाबा मला घरी न्या. इथे हे लोक मला ब्ल’कमेल करीत आहे. मारहाण करीत आहे.

मला खूप त्रास देत आहेत. दुसऱ्या दिवशी फोन आला की, मुलगी मेली आहे. मुलीचा मृतदेह कल्याणच्या रक्मीणबाई रुग्णालयात नेला आहे.याठिकाणी मुलीच्या नातेवाईकासह आरपीआ निकाळजे गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, शालीनी वाघ पोहचले. या मुलीसोबत ज्या मुलाचे लग्न झाले होता. तो मुलगा रोहन म्हस्के आणि रोहनची बहिण नेहा जाधव अन्य नातेवाईक रुग्णलायात होते. या वेळी मुलीच्या नातेवाईकांसह आरपीआयच्या पदाधिकाऱ््यांनी रोहन आणि नेहाला चांगलाच चोप दिला. एका महिनेने तर राेहनला काळे फासले. टिटवाळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी दिनकर चकोर हे देखील होते. त्वरीत कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रोहन आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी दिनकर चकोर यांनी म्हटले आहे की आम्हाला हँगिंगच्या कॉल होता. नातेवाईकांचा जो आरोप आहे. त्या आधारे तपास केला जाईल. मुलीच्या शवविच्छेदानाचा अहवाल काय येतो. त्यावरुनही काही गाेष्टी स्पष्ट होईल. मुलगी अल्पवयीन होती. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे. त्याचा तपास आम्ही करीत आहोत.

Web Title: forced marriage of minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.