"बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 04:23 PM2020-12-14T16:23:23+5:302020-12-14T16:23:47+5:30

प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक  माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवारी केली. 

Former BJP MLA Narendra Pawar has criticized Shiv Sena MLA Pratap Saranaik | "बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता"

"बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता"

googlenewsNext

डोंबिवली: हिंदवी स्वराज स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्यासाठी प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत तुलना करत तानाजी मालुसरे यांची बदनामी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवारी केली. 

नरवीर तानाजी मालुसरे हे योद्धे होते. निधड्या छातीने स्वराजाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढले, त्यांचे बलिदान हे या मातीला प्रेरणा देणारे आहे. मात्र सरनाईक यांनी आपली तुलना नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत करतानाच त्यांचा अपमान केला आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकही असे नव्हते. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच सरनाईकांचा कडेलोट केला असता. तानाजी मालुसरे व्हायला धमन्यांमध्ये हिंदवी स्वराज्य रक्षणाचे रक्त सळसळले पाहिजे, पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये. ते शूरवीर योद्धे होते त्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असेही पवार म्हणाले.

Web Title: Former BJP MLA Narendra Pawar has criticized Shiv Sena MLA Pratap Saranaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.