शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याने हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:15 PM2021-09-09T18:15:29+5:302021-09-09T18:17:39+5:30

पेणकर यांच्या निधनाचे वृत्त कळतात शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात ते रस्त्यावर उतरुन काम करीत होते.

Former Shiv Sena corporator Prakash Penkar passes away | शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याने हळहळ

शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याने हळहळ

googlenewsNext

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि दोन मुले, असा परिवार आहे. पेणकर यांना लिव्हरचा आजार होता. त्यांचा लहान मुलगा प्रतिक याने त्यांना लिव्हर दिले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असताना त्यांचे आज सकाळी निधन झाले. (Former Shiv Sena corporator Prakash Penkar passes away)

पेणकर यांच्या निधनाचे वृत्त कळतात शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात ते रस्त्यावर उतरुन काम करीत होते. पेणकर यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. कल्याण रेल्वे स्थानकात त्यांनी किशोर वयात पेपर विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर ते रिक्षा चालक होते. रिक्षा चालविताना त्यांनी 1975 साली रिक्षा चालक मालकांची संघटना बांधली. कोकण रिजन रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे ते अध्यक्ष होते. रिक्षा चालकांसाठी त्यांनी पतपेढी सुरु केली. एका प्रभागातून ते चार वेळा नगरसेवक पदी निवडून आले होते. 

सुरुवातीला ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमध्ये सदस्य होते. त्यानंतर ते परिवहन समिती सभापती होते. त्याच्या कार्यकाळात महापालिकेच्या परिवहन सेवेचा शुभारंभ झाला. त्यांनी परिवहन कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष पद भूषविले. त्याचबरोबर त्यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या उपाध्यक्ष पदाची धुराही संभाळली होती. 2013 साली ते महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी होते. त्यांना सभागृह पदही दिले गेले होते. अनेक पदे भूषवित असताना त्यांच्यातील सच्च शिवसैनिक आणि कार्यकर्ता प्रत्येक वेळी अनेकांना पाहावयास मिळला. त्यांना नाना या नावानेही संबोधले जात होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Former Shiv Sena corporator Prakash Penkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.