घरात आग लागल्यानं एकाच कुटुंबातील चौघे भाजले; डोंबिवलीतील दुर्दैवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 12:54 PM2022-10-01T12:54:07+5:302022-10-01T12:56:03+5:30

भोपर परिसरातील धक्कादायक घटना, घरात आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघे भाजल्याने गंभीर जखमी 

Four members of the same family got burnt due to house fire; Unfortunate incident in Dombivli | घरात आग लागल्यानं एकाच कुटुंबातील चौघे भाजले; डोंबिवलीतील दुर्दैवी घटना

घरात आग लागल्यानं एकाच कुटुंबातील चौघे भाजले; डोंबिवलीतील दुर्दैवी घटना

Next

मयुरी चव्हाण

डोंबिवली - भोपर परिसरात पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका घरात अचानक लागलेल्या आगीमुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यात आईसह दोन मुलींची प्रकृती चिंताजनक आहे.  पहाटे ५ वाजता ही घटना घडल्याचं पोलिसांनी माहिती दिली. आगीच्या कारणाचा शोध सुरू असून  जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रसाद पाटील , प्रीती पाटील वाणी 14 वर्षीय समीरा व 11 वर्षीय समीक्षा असे या चारही जखमींचे नाव असून यात आई सह दोन मुलींची प्रकृती चिंताजनक असून चौघांचाही उपचार डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात सुरू आहे सध्या पोलीस व अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून ही आग कशी लागली याचा शोध घेत आहे

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Four members of the same family got burnt due to house fire; Unfortunate incident in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.