मलंग गडावर जाण्यासाठी फ्यूनिक्यूलर ट्रॉली, कामाला देणार गती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 03:22 PM2021-07-16T15:22:54+5:302021-07-16T15:23:42+5:30

या बैठकीस सुप्रिम एजेन्सीला काय अडचणी येत आहे. यावरही चर्चा केली. ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा ट्रॉलीचे रखडलेले काम सुरु करण्यात येणार आहे. काम सुरु झाल्यावर येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना अप्पर सचिवांनी एजेन्सीला दिलेल्या आहे.

Funicular trolley to get to Malang fort, will speed up the work | मलंग गडावर जाण्यासाठी फ्यूनिक्यूलर ट्रॉली, कामाला देणार गती

मलंग गडावर जाण्यासाठी फ्यूनिक्यूलर ट्रॉली, कामाला देणार गती

Next
ठळक मुद्देफ्यूनिक्यूलर ट्रॉलीच्या कामाला २००७ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. खाजगीकरणाच्या माध्यमातून ही ट्रॉलीची व्यवस्था बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर उभारण्यासाठी निविदा मागविली गेली. ४५ कोटी ९१ लाख रुपयांची निविदा सुप्रीम एजेन्सीला मंजूर करण्यात आली.

कल्याण - कल्याणनजीक असलेल्या प्रसिद्ध मलंग गडावर जाण्यासाठी फ्यूनिक्यूलर ट्रॉली तयार करण्यात येत आहे. या ट्रॉलीच्या कामाला ऑगस्ट २०२१ मध्ये गती मिळणार असल्याची माहिती भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. ट्रॉली बसविण्याचे काम ब:याच दिवसापासून रखडले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार कथोरे यांनी सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाचे अप्पर सचिव मनोज सैनिक यांच्यासोबत काल गुरुवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी फ्यूनिक्यूलर ट्रॉलीच्या काम रखडले असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

या बैठकीस सुप्रिम एजेन्सीला काय अडचणी येत आहे. यावरही चर्चा केली. ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा ट्रॉलीचे रखडलेले काम सुरु करण्यात येणार आहे. काम सुरु झाल्यावर येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना अप्पर सचिवांनी एजेन्सीला दिलेल्या आहे.

फ्यूनिक्यूलर ट्रॉलीच्या कामाला २००७ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. खाजगीकरणाच्या माध्यमातून ही ट्रॉलीची व्यवस्था बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर उभारण्यासाठी निविदा मागविली गेली. ४५ कोटी ९१ लाख रुपयांची निविदा सुप्रीम एजेन्सीला मंजूर करण्यात आली. या एजेन्सीला कामाचा कार्यादेश मिळताच ट्रॉलीच्या कामाला सप्टेंबर २०१२ रोजी सुरुवात झाली. दरम्यान मलंग गडाचा परिसर हा माथेरान इकोझोन क्षेत्रत येत असल्याने या समितीने या प्रकल्पास २०११ रोजी मान्यता दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी गठीत केलेल्या समितीनेही २०११ साली मंजूरी दिली होती. वनखात्याचा ना हरकत दाखला २००८ सालीच प्राप्त झाला होता. प्रकल्प २४ महिन्याच्या मुदतीत पूर्ण करणो अपेक्षित होते. प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण होत नसल्याने एजेन्सीला २०१८ सालार्पयत मुदतवाढ देण्यात आली. सप्टेंबर २०१९ पासून प्रकल्पाचे काम बंद होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाला. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असल्याने या प्रकल्पासा गती देण्यासाठी आमदार कथोरे ही बैठक घेऊन सरकारचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Funicular trolley to get to Malang fort, will speed up the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.