केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे बाप्पाचे विसर्जन वेटिंगला, गणेश भक्तांनी व्यक्त केला तीव्र संताप
By मुरलीधर भवार | Published: September 20, 2023 09:26 PM2023-09-20T21:26:14+5:302023-09-20T21:27:21+5:30
या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले.
कल्याण - कल्याण डाेंबिवली महापलिकेने गणेश विसर्जनासाठी चोक व्यवस्था केली असल्याचा दावा केला होता. मात्र महाालिकेचा हा दावा कल्याण पश्चिमेतील केडीएमटी बस डेपोजवळ असलेल्या गणेश विसर्जन घाटावर फोल ठरला आहे. या ठिकाणी आलेल्या गणेश मूर्त्या विसर्जन करण्याकरीता पाण्यात उतरणारे कामगार नसल्याने बाप्पांना विसर्जनासाठी वेटिंगला राहावे लागले. अखेरी संतप्त गणेश भक्तांनी त्यांच्या गणेशाला निरोप देण्यासाठी दुसरीकडेचे विसर्जन स्थल गाठले. या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले.
महाापलिकेने केडीएमटी बस डेपोजवळील गणेश घाटावर विसर्जनाची व्यवस्था केली होती. आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने अनेक गणेश भक्त त्यांच्या घरातील बाप्पाची मू्र्ती घेऊन गणेश घाटावर पोहचले. त्याठिकाणी त्यांनी आरत्या सुद्धा घेतल्या. मात्र गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोणाच्या हाती द्यायची यासाठी जबाबदार व्यक्तीच नसल्याने त्यांची घोर निराशा झाली.
या ठिकाणी विसर्जनाकरीता आलेल्या विद्या गोळे यांनी सांगितले, याठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी आले होते. त्याठिकाणी विसर्जनासाठी मुले नव्हती. मूर्ती ठेवण्याकरीता कठडा देखील नव्हता. दर वर्षी आम्ही विसर्जनाकरीता येतो. तेव्हा व्यवस्था असते. यंदा व्यवस्था नसल्याने आम्हाला बाप्पाची मूर्ती घेऊन परत माघारी फिरावे लागले. दुसऱ््या ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करणार आहे.
किरण खाडे हे देखील विसर्जनाकरीता त्यांच्या बाप्पाची मूर्ती घेऊन आले होते. आरती केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्याठिकाणी मूर्ती विसर्जनाकरीता मुले नाहीत. घारात बाप्पाचे दीड दिवस पूजन केले. त्यांचा अवमान महापालिकेकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, याठिकाणी आमचा पोलिस बंदोबस्त आहे. मात्र मूर्ती विसर्जनाकरीता मुले नसल्याने एखादा विसर्जनाच्या वेळी कोणी बुडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. विजेसह जनरेट लावला आहे. त्याठिकाणी अग्नीशमन दलाचे दोन तरुण होते. मूख्य व्यवस्थाच नव्हती.
याठिकाणी अन्य लोकही विसर्जनाकरीता आले. मात्र त्याठिकाणी व्यवस्थाच नसल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले. अखेरीस या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसही निघून गेले.
याठिकाणी महापालिकेने गणेश भक्तांचे स्वागत करणारा फलक लावला होता. त्यात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली असल्याचा उल्लेख होता. त्याठिकाणी कृत्रिम तलावच नव्हता. महापालिका कर्मचाऱ््यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले आमच्यावर केवळ स्वच्छतेचेची जबाबदारी दिली गेली आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना ही बाब कळताच त्यांनी या प्रकरणात तातडीने दखल घेऊन काय झाले आहे ते पाहते असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.