Ganeshotsav: गणोशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता शिवसेनेतर्फे मोफत बस सेवा, या ठिकाणाहून सुटणार बस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:33 PM2021-08-21T15:33:20+5:302021-08-21T15:35:06+5:30
Free bus service from Shiv Sena: गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली.
कल्याण - गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. (Ganeshotsav 2021) ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली. (Free bus service from Shiv Sena to go to Konkan for Ganeshotsav)
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमाणी मेटाकूटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या आप्तस्वकीयांसोबत गणोशोत्सव साजरा करण्याकरीता जाण्यासाठी कोकणवासीय चाकरमान्यांची प्रचंड ओढ आहे. महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळून मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणोश उत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता डोंबिवलीतून मोफत बस सेवा दिली जाणार आहे. डोंबिवलीशिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक,संतोष चव्हाण, सागर जेधे यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षीत करण्यासाठी 4 सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.