उल्हासनगरात ऐन गणेशोत्सवात पाणी टंचाई आमदार आयलानी यांनी घेतली बैठक!
By सदानंद नाईक | Published: September 22, 2023 04:30 PM2023-09-22T16:30:11+5:302023-09-22T16:39:26+5:30
गेल्या आठवड्यात आमदार गणपत गायकवाड यांनी पाणी टंचाई बाबत महापालिका कार्यालयात बैठक घेऊन अपशब्द लढल्याचा प्रकार उघड झाला होता.
उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणी टंचाईची समस्या उभी टाकल्याने, आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या आठवड्यात आमदार गणपत गायकवाड यांनी पाणी टंचाई बाबत महापालिका कार्यालयात बैठक घेऊन अपशब्द लढल्याचा प्रकार उघड झाला होता.
उल्हासनगरातील विविध भागात ऐन पावसाळ्यात व गणेशोत्सव दरम्यान पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आमदार कुमार आयलानी यांच्याकडे पाणी टंचाईच्या तक्रारी आल्यानंतर, त्यांनी आमदार कार्यालयात महापालिका पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांची गुरवारी बैठक बोलावली होती. यावेळी आमदार आयलानी यांनी अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन पाणी समस्यावर उपाययोजना मागितली.
बैठकीला एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आव्हाड, महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे परमेश्वर बुडगे आदीसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहर पूर्वेतील सुभासनगर टेकडी परिसराला दोन दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. गेल्या आठवड्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पाणी टंचाईवर महापालिकेत बैठक घेऊन आयुक्त अजीज शेख यांच्या समक्ष अधिकाऱ्यांना अपशब्द काढली होती.