गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

By मुरलीधर भवार | Published: August 23, 2023 07:04 PM2023-08-23T19:04:21+5:302023-08-23T19:05:35+5:30

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाचे शुल्क आकारण्यात येऊ नये अशी मागणी भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

Ganeshotsav mandals should not charge mandap fee Former BJP corporator's demand to commissioner | गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

googlenewsNext

कल्याणकल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाचे शुल्क आकारण्यात येऊ नये अशी मागणी भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. महापालिका हद्दीत २०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहे. या पैकी काही सार्जनिक मंडळे अत्यंत जुनी आहेत. तर काही मंडळे ही बालगोपाळांची आहेत. या मंडळांकडून आपत्ती काळात नागरीकांना मदतीचा हात दिला जातो.

 अतिवृष्टीच्या दरम्यान ही मंडळे पाण्यात उतरून नागरीकांच्या मदतीला धावतात. कोरोना काळातही या मंडळाकडून नागरीकांना अन्न धान्य, जेवणाची पाकिटे, औषधे पुरविली गेली होती. या मंडळाचा कारभार हा लोकवर्गणीतून चालतो. लोकवर्गणी गोळा करुन ही मंडळे उत्सव साजरा करता. गणेश उत्सव मंडळाकडून सामाजिक आणि प्रबोधनपर देखावे साकारले जातात. त्या देखाव्यासह मंडप उभारणे, पूजा अर्चा, प्रसाद, रोषणाई, गणेश आगमन, विसर्जन मिरवणूक, वाजंत्री, ट्राली आदीचा बराच खर्च असतो. सामाजिक बांधिलकी जपणाऱ््या सार्वजनिक गणेशोत्वस मंडळाकडून महापलिकेेने मंडळ उभारण्यासाठी शुल्क आकारु नये. या शुल्कातून त्यांची सुटका करावा अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक धात्रक यांनी आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर प्रशासन प्रमुख आयुक्तांकडून काय निर्णय घेतला जातो. याकडे सार्वजनिक मंडळांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ganeshotsav mandals should not charge mandap fee Former BJP corporator's demand to commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.