सामूहिक बलात्कार; दोघा नराधमांना ठोकल्या बेड्या
By प्रशांत माने | Published: January 29, 2023 07:42 PM2023-01-29T19:42:38+5:302023-01-29T19:43:45+5:30
मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे लावला छडा
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडली. या गुन्हयातील दोघा नराधमांना मोबाईलच्या आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी ३० तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच तपास पथके तयार केली होती. आरोपी हे नेहमीच खाडी किनारा परिसरात जात होते. त्यांनी अशा काही घटना आधी केल्यात का याचा तपास पोलिस करीत आहेत.
विष्णु सुभाष भांडेकर (वय २५) रा. नेवाळी नाका आणि आशिष प्रकाशचंद गुप्ता (वय ३२) रा. दत्त चौक नांदिवली रोड, डोंबिवली अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील विष्णू हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून नुकताच तो जामिनावर कारागृहातून सुटला होता. तर आशिष हा चहा टपरीवर काम करायचा. शुक्रवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र ठाकुर्ली पश्चिमेत रेल्वे स्थानक लगतच्या खाडी किनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन तरुण पिडीता आणि तिच्या मित्राजवळ आले. आम्ही पोलीस आहोत असे सांगत त्यांना घाबरवले. त्यांनी त्याचे मोबाईल कॅमेरात चित्रीकरण देखील केले.
घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर आम्ही तुझी समाजमाध्यमांवर बदनामी करू अशी धमकी देखील दिली होती. दरम्यान याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर आरोपींच्या शोधासाठी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सुधाकर पाठारे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक मोहन खंदारे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल तारमळे, अविनाश वनवे यांची पथके नेमली होती.
मोबाईलवरून पटली आरोपींची ओळख
आरोपींनी बलात्कार करताना मोबाईलमध्ये चित्रण केले होते. मोबाईल ज्या कंपनीचा होता त्याची माहीती पिडीतेने पोलिसांना दिली होती. त्यावरून घटनेच्या वेळी त्या परिसरात संबंधित कंपनीचे किती फोन अॅक्टीव होते याची माहीती मिळविण्यात आली. त्याआधारे आरोपी र्पयत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
निर्जनस्थळी जाणं टाळावे
दरम्यान निर्जनस्थळी काही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे अशा निर्जनस्थळी जाणे टाळावे असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"