गणेश मंडळांना बाप्पा पावला!; फायर एनओसीसाठी शुल्क आकारले जाणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:11 PM2021-09-02T20:11:48+5:302021-09-02T20:12:53+5:30

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

ganpati utsav no need to give charges for fire noc kalyan dombivali | गणेश मंडळांना बाप्पा पावला!; फायर एनओसीसाठी शुल्क आकारले जाणार नाही 

प्रातिनिधीक छायाचित्र

Next
ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना काळात गणेशोत्सवासाठी  कल्याणडोंबिवली महानगरपालिकेकडून काय नियमावली असणार  याबाबत उत्सुकता होती. अखेर केडीएमसी प्रशासनाची गणेशोत्सव  मंडळांबरोबर गुरुवारी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी व इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनी देखील फायर एनओसी घेणे अत्यावश्यक आहे असे देखील  प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी  या बैठकीत सहभाग घेतला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी  वाहतूक शाखा यांचा ना-हरकत दाखला, अग्निशमन विभागाच्या ना-हरकत दाखला, म.रा.वि.वि.कं.लिमिटेड यांच्याकडील तात्पुरती परवानगी व पोलिस स्टेशनच्या ना-हरकत दाखला इ. करीता संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत असणा-या स्थानिक पोलिस स्टेशननिहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचा-याची नियुक्ती करुन  "एक खिडकी योजना" कार्यान्वित करण्यात येणार असून परवानगीसाठी  5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत अशी माहिती आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. तसेच एक आदर्श घालूया- नियम पाळून श्रीगणेश उत्सव साजरा करु या, असे आवाहन देखील सूर्यवंशी यांनी केले. 

कसे केले आहे केडीएमसीने नियोजन ? 
महापालिका परिसरात एकुण 68विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था. 

विसर्जन स्थळी व विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांची त्याचप्रमाणे 2447 हॅलोजन लाईटची व्यवस्था
गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहे. 

कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील "विसर्जन आपल्या दारी" हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे.

पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघ‍डीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते बुजविणेबाबतच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. 

काय आहेत नियम ? 
गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6x8 इतकीच असावी.

गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करावे. 

जबाबदारीने, आनंदात पण शिस्तीत त्याचप्रमाणे विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करावा. 

उत्सवादरम्यान जेष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

Web Title: ganpati utsav no need to give charges for fire noc kalyan dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.