रिक्षाचा गॅस लिक झाल्याने एकच धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 03:38 PM2020-11-15T15:38:38+5:302020-11-15T15:39:37+5:30

Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर एका रिक्षातून गॅस लिक होऊ लागल्याने एकच धावपळ माजली. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

gas leak of rickshaw in Kalyan | रिक्षाचा गॅस लिक झाल्याने एकच धावपळ

रिक्षाचा गॅस लिक झाल्याने एकच धावपळ

Next

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर एका रिक्षातून गॅस लिक होऊ लागल्याने एकच धावपळ माजली. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. रस्त्यावर उभी असलेल्या एका सीएनजी गॅसवर चालणा-या रिक्षातून गॅस लिक होऊ लागला. त्यावेळी रिक्षा चालकाने सगळ्य़ांना आवाज देत गॅस लिक झाला आहे असे सांगितले. तेव्हा लोकांमध्ये एकच धावपळ माजली.

रिक्षातील गॅस फिलींग करण्यात येणारे झाकण उघडून गॅस बाहेर कसा पडेल यासाठी रिक्षा चालकाने प्रयत्न सुरु केले. त्या झाकण उघडून दूरवर उपस्थित राहणो पसंत केले. ही घटना कॅमे-यात कैद करण्यासाठी महापालिकेतील पत्रकारांनी त्याठिकाणी धाव घेतली. तर सुरक्षा रक्षकांनी अग्नीशमन दलास फोन कॉल करुन पाचारण केले. दरम्यान गॅस लिक होत असल्याने प्रसंगी गॅसचा बाटला फूटून मोठा अपघात होऊ शकतो याची भिती अनेकांना होती. अनेकांनी रस्त्यावरुन जाणा-या दुचाकी चालकांना पुढे जाऊ नका असे सांगितले. अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचे र्पयत रिक्षातून सगळा गॅस रिता झाला होता. तेव्हा कुठे रस्त्यावरील दुकानदारांसह रिक्षा चालकाचा जीव भांडय़ात पडला.

Web Title: gas leak of rickshaw in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.