गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल आत्ता डोंबिवलीत; जूनपासून सुरू होणार शाळा

By मुरलीधर भवार | Published: February 10, 2023 05:59 PM2023-02-10T17:59:19+5:302023-02-10T18:00:32+5:30

डोंबिवली - ठाण्यापाठोपाठ आत्ता डोंबिवली शहरात गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल मोठा गाव ठाकूर्ली येथील एका बडय़ा गृहसंकुल प्रकल्पात सुरु ...

Gautam Singhania Global School now in Dombivli; School will start from June | गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल आत्ता डोंबिवलीत; जूनपासून सुरू होणार शाळा

गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल आत्ता डोंबिवलीत; जूनपासून सुरू होणार शाळा

googlenewsNext

डोंबिवली - ठाण्यापाठोपाठ आत्ता डोंबिवली शहरात गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल मोठा गाव ठाकूर्ली येथील एका बडय़ा गृहसंकुल प्रकल्पात सुरु होत असल्याने शाळेला हवे असलेली मोकळी जागा आणि चांगले वातावरण या सगळ्य़ा गोष्टी जुळून आल्या आहेत. येत्या जून महिन्यापासून ही शाळा सुरु होणार असल्याची माहिती सिंघानिया शाळेच्या संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी दिली आहे. 

यासंदर्भात माहिती देण्यासाठी संचालिका श्रीनिवासन यांच्या वतीने आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कल्याण डोंबिवली महापालिका माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शाळेचे पदाधिकारी निशांत कौशीक, राजेश कारिया, सचिन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. 

संचालिका श्रीनिवासन यांनी सांगितले की, सिंघानियांच्या शाळा देशभरात गेल्या १२ वर्षात टॉप  पाईव्हमध्ये राहिल्या आहेत. ठाण्यात सिंघानिया शाळेच्या तीन शाखा आहे. ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीत शाळा सुरु केली जात आहे. त्याकरीता पालकांशी उद्या १२ फेब्रुवारी रोजी संवाद साधला जाणार आहे. नर्सरी टू केजी या वर्गाची सुरुवात प्रथम केली जाणार आहे. जवळपास १ ते  २ हजार विद्यार्थी क्षमता आहे. शाळेच्या प्रवेशाकरीता डोनेशन घेतले जात नाही. त्याचबरोबर अन्य शाळांच्या तुलनेत शाळेची वार्षिक फी ही मर्यादीत आणि पालकांच्या खिशाला परवडणारी आहे. शाळेत शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होतील असे विद्यार्थी घडविले जातात. शाळेत आनंददायी शिक्षणाची संकल्पना राबविली जाते. शाळेसाठी खुली जागा लागते. विद्यार्थ्यांकरीता गार्डन खेळाचे मैदान लागते. त्या सगळ्य़ा गोष्टी डोंबिवलीत उपलब्ध आहेत. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी आहे. त्यानगरीत सिंघानिया शाळेचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे डोंबिवलीतील शैक्षणिक दर्जा नक्कीच वाढील लागेल असा विश्वास संचालिका श्रीनिवासन यांनी यावेळी व्यक्त केला. 

माजी स्थायी समिती सभापती म्हात्रे यांनी सांगितले की, डोंबिवली ग्लोबल स्कूल सुरु व्हाव्यात अशी आपेक्षा होती. डोंबिवली काही ग्लोबल स्कूल आहेत. मात्र सिंघानिया यांचे नाव आहे. या नावात सगळे काही आहे. त्यामुळे डोंबिवलीचा नौवलौकिक या सिंघानिया शाळेमुळे नक्कीच वाढणार असा मला विश्वास आहे.
 

Web Title: Gautam Singhania Global School now in Dombivli; School will start from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.