घरातच आढळल्या 2 घोरपडी, सर्पमित्राने परिसरातला सापही पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:19 PM2021-10-22T20:19:49+5:302021-10-22T20:20:30+5:30
जोशीबाग परिसरात एक सापही आढळून आला होता, त्यालाही बोबडे यांनी पकडले आहे. दोन घोरपडी आणि एका सापाला बोबडे यांनी वनविभागाच्या हवाली केले आहे
कल्याण - कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरातील एका महिलेच्या घरातील किचनमध्ये दोन घोरपडी घुसल्या होत्या. महिलेने याची माहिती सर्प मित्र सतीष बोवडे यांना दिली. बोबडे यांनी तातडीने जोशीबागेत धाव घेत घरातील किचनमध्ये घुसलेल्या दोन घोरपडींना बोबडे यांनी बाहेर काढले. त्यामुळे, कुटुंबातील सदस्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
जोशीबाग परिसरात एक सापही आढळून आला होता, त्यालाही बोबडे यांनी पकडले आहे. दोन घोरपडी आणि एका सापाला बोबडे यांनी वनविभागाच्या हवाली केले आहे. एक घोरपड दोन फूट तर दुसरी चार फूट लांब होती. बोबडे यांनी सांगितले की, स्टेशन परिसरात असलेल्या पोलिस लाईनमध्ये लोकवस्तीत नसल्याने त्याठिकाणी झाडे झुडपे वाढली आहेत. त्याठिकाणी सरपटणारे प्राणी आढळून येत आहे. मागच्या काही दिवसात याच परिसरात सर्प आणि घोरपड मिळून आल्याच्या घटना घडल्या आहेत.