शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईनचा पर्याय द्या! निवडणूक आयोगाकडे मागणी

By अनिकेत घमंडी | Published: September 12, 2023 03:19 PM2023-09-12T15:19:25+5:302023-09-12T15:20:05+5:30

भाजपाचे अनिल बोरनारे व धनराज विसपुते यांची मागणी 

Give online option for registration in teacher-graduate constituencies! Demand to Election Commission | शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईनचा पर्याय द्या! निवडणूक आयोगाकडे मागणी

शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईनचा पर्याय द्या! निवडणूक आयोगाकडे मागणी

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली: विधान परिषदेच्या जूनमध्ये होणाऱ्या मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लवकरच मतदार नोंदणी सुरू होणार असून मतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे तसेच भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे राज्य संयोजक धनराज विसपुते यांनी मंगळवारी केली. याबाबत बोरनारे, विसपुते यांनी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी निवेदन दिले आहे.

राज्यात जानेवारीमध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी  धनराज विसपुते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती विसपुते यांच्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत आयोगाला आदेश दिले होते आयोगाने पण  पर्याय उपलब्ध करून दिल्याने  नोंदणी वाढून मतदानाचा टक्का वाढला होता. सध्याची  मतदार नोंदणी प्रक्रिया ही अत्यंत किचकट आहे.  परिणामी नोंदणी न झाल्याने मतदानावर परिणाम होऊन मतदानाचा टक्का वाढत नाही.

सध्या ई-सेवांमुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीही ऑनलाइन झाल्यास मतदान करणाऱ्या पदवीधरांची व शिक्षक मतदारांची संख्या वाढेल. शिक्षक मतदार संघात नोंदणी करतांना शिक्षक नसलेले, शिक्षकाची वैयक्तिक मान्यता नसलेल्यांची सुद्धा नोंदणी केली शिक्षक मतदारसंघात ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास बोगस नोंदणीला आळा बसला जाईल असे त्यांनी सांगितले.

Web Title: Give online option for registration in teacher-graduate constituencies! Demand to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक