कल्याणमध्ये रंगणार ग्लोबल खान्देश महोत्सव; ४ दिवसांची रंगारंग मेजवाणी

By मुरलीधर भवार | Published: February 27, 2024 04:29 PM2024-02-27T16:29:50+5:302024-02-27T16:30:22+5:30

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर

Global Khandesh Festival to be staged in Kalyan; 4 days colorful feast | कल्याणमध्ये रंगणार ग्लोबल खान्देश महोत्सव; ४ दिवसांची रंगारंग मेजवाणी

कल्याणमध्ये रंगणार ग्लोबल खान्देश महोत्सव; ४ दिवसांची रंगारंग मेजवाणी

कल्याण - उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजीत ग्लोबल खान्देश महोत्सव दिनांक २ ते ५ मार्च २०२४ रोजी फडके मैदान लालचौकी येथे रंगणार आहे. संपूर्ण कल्याणकरांसाठी खानदेश वासियांसाठी हा महोत्सव म्हणजे परभणीच असते खानदेशातील अतिशय प्रसिद्ध अशा सर्वच गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला आणि आस्वाद घ्यायला मिळतात अनेक जण आतुरतेने या महोत्सवाची वाट बघताना दिसून येतात.  दिवसेंदिवस महोत्सवा ची वाढत जाणारी लोकप्रियता आणि कल्याणकरांचा लाभणारा उदंड प्रतिसाद या साऱ्या गोष्टींचा विचार करत या वर्षाचा ग्लोबल खान्देश महोत्सव हा फडके मैदान, लालचौकी, कल्याण येथे आयोजित करण्याचे ठरले आहे.           

हा उत्सव म्हणजे मातीशी नातं सांगणारा उत्सव. ना नफा ना तोटा या तत्त्वावर फक्त अनेक होतकरू शेतकरी आणि उद्योजक यांना हक्काचं एक व्यासपीठ, रोजगार उपलब्ध व्हावा.  त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री या ठिकाणी त्यांना करता यावी.  यासाठी या खानदेश महोत्सवाचा आयोजन हे करण्यात येत असते. आपल्या मातीचा उत्सव, चला साजरा करूया खान्देश महोत्सव. कृषी-खाद्य, कला-उद्योग-पर्यटन, गौरव, पर्यावरण हि ग्लोबल खान्देश महोत्सवची वैशिष्टे. दि ०२ मार्च ते दि ०५ मे २०२४ सायंकाळी ०५ ते रात्री १० वाजेपर्यंत येथे सर्व कार्यक्रमांची रेलचेल चालणार आहे.. कल्याण पश्चिमकरांसाठीच नव्हे तर मुंबई ते कर्जत, कसारा, मुंबई ते डहाणू या पट्ट्यातील खान्देशवासीयांसाठी मेजवानीचा हा महोत्सव अध्यक्ष विकास पाटील व इतर मंडळीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणार आहे. 

खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर

रामेश्वर नाईक, विश्वासराव शेळके पाटील यांना खान्देश भूषण, संजय बोरगावकर यांना खान्देश उद्योग रत्न, तर प्रशासकीय सेवेतील,जे. डी.पाटील, उन्मेष वाघ व योगेश पाटील यांना खान्देशश्री तसेच कला क्षेत्रातील सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर यांना खान्देशश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.
    
शनिवार दि ०२ मार्च २०२४ शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्यमहोत्सव सायंकाळी ६.०० ते ८.०० (समुह नृत्य स्पर्धा), सायंकाळी ८.०० ते ९.०० वाजेपर्यंत उद्घाटन सोहळा सत्कारमूर्ती गौरव मान्यवर मनोगत सायंकाळी- ९.०० ते १०.०० वाजेपर्यंत. 

रविवारी दि ०३  मार्च २०२४ सदाबहार संगीत रजनी, सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत  पुष्पा ठाकूर व सचिन कुमावत यांचा स्पेशल खान्देशी बॉलिवूडचे सेलेब्रिटी परफॉर्मन्स, सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ८.०० ते १०.०० वाजेपर्यंत सत्कारमूर्ती गौरव व मान्यवर मनोगत

सोमवारी दि ०४ मार्च २०२४ खान्देशी ऑर्केस्ट्रा सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत. सत्कारमूर्ती गौरव मान्यवर मनोगत सायंकाळी ००८ ते १०.०० वाजेपर्यंत

मंगळवार दि ०५ मार्च २०२४ सांस्कृतिक कार्यक्रम एंटरटेनमेंट तडका श्रद्धा महीरे (नृत्य दिग्दर्शिका), निमिष कुलकर्णी (महाराष्ट्र हास्य जत्रा फेम), दिलीप केदार,(मिमिक्रीआर्टिस्ट) सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत  सत्कारमूर्ती गौरव, सांगता समारोह सायंकाळी ०८ ते १० वाजेपर्यंत. असा ०४ दिवसाचा रंगारंग कार्यक्रमाने ग्लोबल खान्देश महोत्सव संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी ०६ ते रात्री १० वाजेपर्यंतचा भरगच्च मनोरंजनाचा कार्यक्रम तुमच्यासाठी ग्लोबल खानदेश महोत्सव घेऊन येत आहे. कल्याणकरांनी  त्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष, नरेंद्रजी सुर्यवंशी निमंत्रक,  विकास पाटील, समन्वयक प्रशांत पाटील, ए. जी. पाटील कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर, एल. आर. पाटील, प्रदीप अहिरे, एन. एम. भामरे, सचिव दीपक पाटील, सांस्कृतिक मंच प्रमुख विनोद शेलकर, किशोर पाटील, सुभाष सरोदे, संजय बिलाले, अनिरुद्ध चव्हाण, सल्लागार भरत गाडे, बी. डी बोराळे, डॉ. आनंदराव सूर्यवंशी, गणेश भामरे, सुनील चौधरी, प्रवीण सनेर, जगदीश पाटील, मिलिंद बागुल, विनायक संन्यासी, देविदास पाटील, सतीश पाटील, भूषण चौधरी, भरत पाटील, दीपक महाजन, सुभाष वानखेडे, सुनीता बोरसे, प्रकाश माळी यांनी केले आहे. 

Web Title: Global Khandesh Festival to be staged in Kalyan; 4 days colorful feast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण