दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:43 AM2021-09-17T09:43:24+5:302021-09-17T09:43:49+5:30

कल्याण पश्चिमेकडील कोलीवली रोड, शीसोदिया आर्केड येथे हा स्फोट झाला असून यामध्ये क्रीष्णा कुमार बैनिवाल हे गंभीर जखमी झाले आहेत.

God saved him ... A terrible explosion of a gas cylinder, fortunately the family survived, one was injured in kalyan kdmc | दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले

दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले

Next
ठळक मुद्देस्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हा स्फोट इतका भीषण होता की बैनीवाल यांच्या घराला तडे गेले आहेत. घराबाहेरचे पत्रेदेखील उडाले आहेत. संपूर्ण किचन या स्फोटात जळून खाक झालं आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली तसेच इतर  ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन  दुर्घटना घडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कल्याणमध्येही गुरुवारी रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून 

कल्याण पश्चिमेकडील कोलीवली रोड, शीसोदिया आर्केड येथे हा स्फोट झाला असून यामध्ये क्रीष्णा कुमार बैनिवाल हे गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेबद्दल कॉल आला, असे अग्नीशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी सांगितले. तर घटना घडली तेव्हा घरातील इतर सदस्य बाहेर असल्याने थोडक्यात बचावले असेदेखील ते म्हणाले. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र, त्यांना अन्य ठिकाणी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हा स्फोट इतका भीषण होता की बैनीवाल यांच्या घराला तडे गेले आहेत. घराबाहेरचे पत्रेदेखील उडाले आहेत. संपूर्ण किचन या स्फोटात जळून खाक झालं आहे.
 

Read in English

Web Title: God saved him ... A terrible explosion of a gas cylinder, fortunately the family survived, one was injured in kalyan kdmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.