"छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकास सरकारने १०० कोटी रुपये द्यावेत",राजू पाटील यांची मागणी
By मुरलीधर भवार | Published: July 6, 2024 07:53 PM2024-07-06T19:53:07+5:302024-07-06T19:54:30+5:30
Kalyan News: दावणगिरी जिल्ह्यात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित आहे. या प्रश्नाकडे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा.
- मुरलीधर भवार
कल्याण - दावणगिरी जिल्ह्यात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित आहे. या प्रश्नाकडे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. हा निधी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातच मंजूर करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे स्मारक व्हावे याकरीता ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. त्यांच्या पाठपुरावाची राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. काल राज्य सरकारने विश्वविजेत्या भारतीय संघाला ११ कोटी रुपये देण्याचे घोषित केले आहे. भारतीय टिम जिंकली. देशाभिमानासह महाराष्ट्र अभिमानही राज्य सरकारने जपला पाहिजे. दुर्लक्षित असलेल्या छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या स्मारकासाठी राज्य सरकारने किमान १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा. हा निधी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे. ही मागणी मनसे आमदार पाटील हे पावसाळी अधिवेशनात करणार आहेत. त्याचबराेबर या प्रकरणी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.