शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया
By मुरलीधर भवार | Published: November 8, 2022 02:32 PM2022-11-08T14:32:32+5:302022-11-08T14:32:55+5:30
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
कल्याण-राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नसताना राजकीय दाैरे सुरु आहे. शेतकऱ्यांना आदी मदत द्यावी. शेतकऱ्यांचे अश्रू पूसण्याची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारची आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून ठोस पावले उचलणे अपेक्षित असताना राजकीय दौऱ्यांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत तर दुसरीकडे शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात महेश तपासे यांनी सांगितले.
शिंदे- फडणवीस सरकार अतिशय उदासीन आहे. अतिवृष्टीमुळे जवळजवळ 25 ते 27 लाख हेक्टर शेती उध्वस्त झालीय त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना वाचाळविर पदवी दिली पाहिजे त्यांना शेतकऱ्यांचे दुःख अश्रू दिसत नाहीत. शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अब्दुल सत्तार काय कामगिरी करतात हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याबाबत बोलताना कार्यकर्त्यांची भावना असते आपल्या लोकांचे स्वागत करायचे मात्र जास्तीत जास्त दायित्व कोणाचं आहे. अश्रू पुसण्याची जबाबदारी ही सरकारचे असते. सरकारमध्ये जे लोक आहेत ते मजोरीने काम करतात. सरकारमध्ये जे लोक बसले त्यांच्या मधला मगरुरपणा हा कमी होत नाही आणि या राज्यातल्या शेतकरी असेल दिन दुबळा असेल आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक असेल त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीचे धोरण शिंदे सरकारकडे नाही अशी टीका केली.