कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह; ढोल ताशे, लेझीम, भजनाच्या गजरात स्वागत यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 10:07 AM2022-04-02T10:07:17+5:302022-04-02T10:07:46+5:30
कल्याण - हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा रद्द झाल्या होत्या ...
कल्याण - हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा रद्द झाल्या होत्या .यंदा सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर आज ठिकठिकाणी स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या.
कल्याण पूर्वेत देखील स्वागत यात्रेला पंधरा वर्षांची परंपरा आहे. आज कल्याण पूर्वेत हिंदू नववर्ष समितीच्या वतीने स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती . आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुढी पूजन करून स्वागत यात्रेला सुरुवात झाली. या स्वागत यात्रेत तरुण-तरुणींचा नागरिकांचा उत्साह दिसून आला .गणपती मंदिरापासून ते आई तिसाई मंदिरापर्यंत या यात्रेचा मार्ग आहे .या स्वागत यात्रेमध्ये तरुण-तरुणी ,नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते ,ढोल ताशे लेझीम पथक ,वारकरी ,घोडयावर स्वार झालेल्या महिला ,बालशिवाजी देखील या यात्रेत सहभागी झाली होती. या यात्रेत देवीदेवतांच्या वेशभूषा करून काही तरुण तरुणी सहभागी झाले होते .त्याचप्रमाणे महिला रिक्षाचालक ,सायकल रॅली ,बाईक रॅली देखील काढण्यात आली होती .
यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी यंदा निर्बंध शिथिल झाल्याने उत्साह आहे मात्र सरकारने निर्णय उशीरा घेतला ,लवकर घेतला असता तर स्वागत यात्रा आणखी व्यापक प्रमाणात काढता आली असती अशी खंत व्यक्त केली