केडीएमसीचा गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा; उभारली पुस्तकांची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 02:39 PM2022-04-02T14:39:24+5:302022-04-02T14:39:44+5:30
कल्याण-गुढी पाडव्याचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महापालिकेने महापालिकेच्या 59 शाळांमधून गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा या उपक्रमाला महापालिका आयुक्त ...
कल्याण-गुढी पाडव्याचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महापालिकेने महापालिकेच्या 59 शाळांमधून गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा या उपक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
महापालिका शाळेतून दिले जाणा:या शिक्षणाचा दर्जा चांगला नसतो अशी समजूत सामान्य पालकांमध्ये असते. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला जात नाही. पालकांचा जास्त ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडे असते. त्यावर मात करुन शाळा प्रवेश वाढविण्यासाठी महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्रमांक 68 मध्ये पुस्तकांची गुढी उभारली. या पुस्तकांच्या गूढीचे पूजन आयुक्त सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याचे गुलाब पुष्प देत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याच्या पालकांशी संवाद साधला जाणार आहे.
त्याचबरोबर ज्यांनी महापालिका शाळेत प्रवेश घेतला नाही अशा मुलांच्या पाल्यांशीही संवाद साधून त्यांना महापालिका शाळेत त्यांच्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. यंदा महापालिका शाळांमध्ये स्कॉलरशीपच्या परिक्षांसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तीन शाळांच्या परिक्षा बोर्डाचे सीबीएससी बोर्डात रुपांतरीत केल्या जाणार आहेत. ज्या पालकांना त्यांच्या पाल्यासाठी सीबीएससी बोर्डाच्या शाळा अभ्यासक्रम असलेल्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा मात्र आर्थिक अडचणीमुळे ते प्रवेश घेऊ शकत नाही. अशा पालकांच्या पाल्यांना या तीन शाळांमध्ये प्रवेश घेऊन त्यांचे सीबीएससी बोर्डाच्या पाल्यांला शिकविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यांच्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी महापालिका घेणार आहेत. महापालिका हद्दीतील एक ही मूल शाळाबाह्य राहू नये. त्याला दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी जनजागृती केली जाईल. शाळा प्रवेश वाढवून महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जाही उंचाविण्यावर या उपक्रमातून भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.