पावसामुळे पडलेल्या घरास गुंजाई फाऊंडेशनचा मदतीचा हात
By मुरलीधर भवार | Published: July 1, 2024 03:40 PM2024-07-01T15:40:51+5:302024-07-01T15:41:16+5:30
कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात जोरदार पावसामुळे रेश्मा भालेराव यांचे घर कोसळले.
कल्याण - कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात जोरदार पावसामुळे रेश्मा भालेराव यांचे घर कोसळले. याची माहिती मिळताच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. भालेराव यांचे पडलेले घर पुन्हा बांधून देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. भालेराव यांना घराच्या बांधकामाकरीता गुंजाई फाऊंडेशनकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. पावसात घर पडले तर लगेच घर कुठून बांधणार. सामान्य माणसाच्या हाती लगेच पैसा नसतो. तसेच घर पडले तर तात्पुरत्या स्वरुपाकरीता भाड्याचे घर घ्यायचे झाले तरी घराचे भाडे परवडणारे नसते. या आर्थिक विवंचनेत असलेल्या भालेराव कुटुंबियांची अडचण लक्षात घेता.
त्यांचे घर पुन्हा बांधून देण्याचे काम गायकवाड यांनी तातडीने सुरु केल्याने भालेराव कुटुंबियांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. मलंग गड पट्ट्यातील काकडवाल गावातील जिजाबाई पावशे यांचे घर देखील पावसामुळे पडले. त्यांच्या घराची नासधूस झाली. पावशे यांच्या घर दुरुस्तीकरीता १० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश गुंजाई फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरातील रहिवासी प्रजापती यांचे घर जोरदार पावसामुळे कोसळले होते. त्यांचे घरही बांधून देण्यास गुंजाई फाऊंडेसनचे पुढाकार घेतला आहे. पावसात मोडलेला संसार उभे पुन्हा उभा करण्यासाठी गुंजाई फाऊंडेशनची मदत मोलाची ठरली असल्याची प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली आहे.