अजब कारभार! गटारे झाली उंच अन् रस्ता गेला खाली; कल्याण-आग्रा रोडवरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 09:43 PM2022-01-03T21:43:35+5:302022-01-03T21:44:01+5:30
कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून गटारे बांधली जात आहे. ही गटारे उंच झाली असून रस्ता खाली गेला आहे.
कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून गटारे बांधली जात आहे. ही गटारे उंच झाली असून रस्ता खाली गेला आहे. त्यामुळे पावसाळ्य़ात रस्त्या लगतच्या सोसायटय़ा आणि दुकानांमध्ये पाणी शिरणार असल्याची बाब व्यापारी व सोसायटीत राहणा:या नागरीकांनी उपस्थीत केली आहे.
कल्याणचे व्यापारी राकेश मुथा यांनी सांगितले की, रस्त्याच्य दुतर्फा गटारे बांधली आहे. ही गटारे अस्तित्वात असलेल्या रस्त्यापेक्षा दोन ते अडीच फूट उंच झाली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या लगत असलेली दुकाने, सोसायटय़ा खाली गेल्या आहे. पावसाळयात त्याठीकाणी पाणी साचणार आहे. व्यापा:यांच्या दुकानात जाण्या येण्यासाठी ग्राहकांना सोयीचे होणार नाही. तसेच रस्त्या लगत असलेल्या सोसायटय़ांही खाली गेलेल्या आहे. सोसायटीच्या तळ मजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरु शकते अशी स्थिती आहे. या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ्अधिकारी वर्गाकडे पत्र व्यवहार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने व्यापारी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले आणि सुधीर बासरे यांनी रस्त्याच्या कडेला बांधली जात असलेली गटारे ही उंच झाली आहे. आधीच्या गटारांच्या ढाच्यावर सिमेंट स्लॅब टाकून गटारे बांधली जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी वर्गाशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून त्याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकले जाणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.