बेकायदा इमारतीवर हातोडा, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:10 PM2021-12-27T20:10:30+5:302021-12-27T20:13:46+5:30
सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कल्याण शीळ मार्गावरील 35 मोठे आणि 60 लहान बॅनर्स होर्डिग काढून अनाधिकृत बाबींना थारा देणार नसल्याचे दाखवून दिले.
कल्याण- नांदिवली गार्डियन स्कूलनजीक असलेल्या तळ अधिक सहा मजली बेकायदा इमारतीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने कारवाईचा हातोडा चालविला आहे. सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही कारवाई केली. जेसीबी, कॉम्प्रेरसर आणि पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
कल्याणमधील निक्कीनगर, वायलेनगर, खडकपाडा, वसंत व्हॅली याठिकाणी असलेल्या बेकायदा बॅनर्स पोस्टर्सच्या विरोधात कारवाई केली गेली. पूना लिंग रोड, तिसगाव, टाटा पॉवर, पत्री पूल या परिसरातील 22 बॅनर्स होर्डिग आणि 12 ङोंडे काढण्याची कारवाईही सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी केली आहे. सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कल्याण शीळ मार्गावरील 35 मोठे आणि 60 लहान बॅनर्स होर्डिग काढून अनाधिकृत बाबींना थारा देणार नसल्याचे दाखवून दिले.