रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीची साईट होते हॅँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:31 PM2021-05-24T16:31:10+5:302021-05-24T16:31:15+5:30

नक्की कधी मिळणार मदत : रिक्षा चालकांचा सवाल

Hang was a site for rickshaw pullers | रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीची साईट होते हॅँग

रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीची साईट होते हॅँग

Next

 

कल्याण-लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया तब्बल एक महिन्यानंतर सुरु झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याकरीता तयार करण्यात आलेली सरकारची साईट सारखी हँग होते. त्यामुळे मदत खात्यात जमा होण्यासाठी रिक्षा चालकांना मनस्तापच सहन करावा लागतो.


राज्यात १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही. हातावर पोट असलेल्यांकरीता जवळपास ४ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहिर केले. रिक्षा चालकांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात येतील अशी घोषणा केली होती. ही मदत तुटपुंजी होती. कारण पहिला लॉकडाऊनचा कालावधी हा १५ ते ३० एप्रिल होता. प्रत्येक दिवसाला 1क्क् रुपये या प्रमाणो १५०० रुपये अशा स्वरुपात ही मदत होती. पहिला कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर पुन्हा १ ते १५ मे लॉकडाऊन कायम होता. आत्ता त्यात वाढ करुन तो ३० मे र्पयत करण्यात आला आहे. तसेच तो आणखीन वाढविला जाणार आहे. १५ एप्रिलच्या आधी सरकारने केलेल्या घोषणोनुसार पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा होण्याची सरकारी प्रक्रिया सुरुच झाली नाही. त्यासाठी ऑनलाईन साईट तयार करण्याकरीता एक महिना वाया गेला. आत्ता साईट तयार झाल्यावर कालपासून रिक्षा चालकांनी मदतीसाठी कागदपत्रंसह नोंदणी सुरु केली आहे. काल पासून ही साईट हँग होत आहे.

आज सकाळी दोन तास साईट हँग होती. तांत्रिक कारणामुळे ही साईट हँग होते. त्याचा मनस्ताप रिक्षा चालकांना सहन करावा लागत आहे. राज्यभरातून रिक्षा चालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही साईट हँग होते. मात्र साईट हॅँग होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी संतोष नवले यांनी केले आहे. राज्यभरात 15क्क् रुपये मदतीचे रिक्षा चालक लाभाथ्र्याची संख्या जवळपास ८ लाख १२ हजार आहे. त्यापैकी कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रतील रिक्षा चालक लाभाथ्र्याची संख्या ६० हजार आहे. आत्तार्पयत केवळ ७० रिक्षा चालकांची नोंदणी झाली आहे. साईट सारखी हँग झाल्यास ६० हजारांची नोंदणी होण्यास किती कालावधी लागू शकतो याची कल्पना केलेली बरी. मदत लवकर देण्यात यावी. प्रसंगी ऑफलाईन प्रक्रिया राबविण्यात यावी. जेणो करुन रिक्षा चालकांच्या खात्यात मदतीची रक्कम लवकर जमा होऊ शकतो.

लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांना सायबर कॅफे उघडे मिळत नाहीत. त्याचबरोबर अनेक रिक्षा चालकाना ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती नाही. कल्याण रिक्षा चालक मालक संघटनेच्या कार्यालयातून रिक्षा चालकाची माहिती ऑनलाईन साईटवर अपलोड केली जात आहे. एकाच वेळी इतक्या मोठय़ा संख्येतील रिक्षा चालकांचे ऑनलाईन काम एकाच संगणकावरुन करणो शक्य होणार नाही. या अडचणी सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे याकडे रिक्षा चालकांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Hang was a site for rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.