हरित डोंबिवली संकल्प : झाडे लावायची आहेत? रविवारी आमच्याशी संपर्क साधा
By अनिकेत घमंडी | Published: June 7, 2024 02:38 PM2024-06-07T14:38:27+5:302024-06-07T14:39:04+5:30
... या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी रविवारी, ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता ज्ञानमंदिर, विवेकानंद सेवा मंडळ, संगीतावाडी, डोंबिवली पूर्व येथे सहभागी होऊन डोंबिवलीस स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यास सहकार्य करावं, असे आवाहन आयोजकांनी केले.
डोंबिवली: शहराला हरित करण्याच्या दृष्टीने हरित डोंबिवली संकल्पांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी रविवारी, ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता ज्ञानमंदिर, विवेकानंद सेवा मंडळ, संगीतावाडी, डोंबिवली पूर्व येथे सहभागी होऊन डोंबिवलीस स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यास सहकार्य करावं, असे आवाहन आयोजकांनी केले.
त्या उपक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने येत्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंचमहाभुतांचे अग्नी, आकाश, पृथ्वी, पाणी आणि वायू नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी आणि शहरी प्रदूषण रोखण्यासाठी डोंबिवलीकरांसाठी वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यशाळेत लावण्यात येणारी स्वदेशी रोपटी नागरिकांनी आपल्या घरी नेऊन, दोन वर्ष त्या झाडांची निगा राखायची आहे. दोन वर्षानंतर हरित डोंबिवली संकल्पांतर्गत आयोजिल्या जाणाऱ्या वृक्षारोपण अभियानात त्या नागरिकांनी स्वहस्ते तो वृक्ष लावायचा असा तो उपक्रम असेल असेही सांगण्यात आले.