चार कोयत्यासह त्याने ठेवला स्टेटस; सोशल मिडियावर व्हायरल होताच पोलिसांनी केली त्याला अटक अन्...

By मुरलीधर भवार | Published: June 2, 2023 02:48 PM2023-06-02T14:48:59+5:302023-06-02T14:49:19+5:30

पुण्यातील कोयता गंगच्या दहशतीनंतर कोयता हे घातक शस्त्रात गणले जाऊ लागले आहे.

He kept the status with four koyats; As soon as it went viral on social media, the police arrested him | चार कोयत्यासह त्याने ठेवला स्टेटस; सोशल मिडियावर व्हायरल होताच पोलिसांनी केली त्याला अटक अन्...

चार कोयत्यासह त्याने ठेवला स्टेटस; सोशल मिडियावर व्हायरल होताच पोलिसांनी केली त्याला अटक अन्...

googlenewsNext

कल्याण - धारदार शस्त्रे हाती घेऊन फोटो सोशल मिडियावर टाकण्याचे वेड तरुणांमध्ये वाढत आहे. कल्याणमधील एका तरुणाने अशाच प्रकारे चार कोयते हाती घेऊन त्याचा व्हीडीआे सोशल मिडियावर अपलोड केला आहे. हा व्हीडीओ कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव प्रदीप यादव असे आहे.

पुण्यातील कोयता गंगच्या दहशतीनंतर कोयता हे घातक शस्त्रात गणले जाऊ लागले आहे. तर एकीकडे घातक शस्त्राचा वापर गुंडाकडून केला जात असतानाच कल्याणमध्ये देखील काही तरुणांकडून कोयता तलवारीसारखी धारदार शस्त्रे बाळगून दहशत माजवण्याचे प्रकार करत आहेत. यामुळेच अशा घातक तरूणावर पोलीस सोशल मिडीयाच्या माध्यमातून करडी नजर ठेऊ लागले आहेत. एका तरुणाने चार कोयते हातात घेतलेला व्हिडियो त्याच्या स्टेटसला ठेवला.

काही वेळातच सोशल मिडीयावर चार कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला .सोशल मिडीयाचा माध्यमातून व्हिडियो पोलिसाच्या हाती लागताच पोलिसांनी या व्हिडीओमधील तरुणाचा शोध घेतला. हा तरुण कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात राहत असल्याचे कळताच पोलिसांनी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावरून प्रदीप यादव या तरुणाला अटक केली . त्याच्याकडून पोलिसांनी कोयते जप्त केले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

Web Title: He kept the status with four koyats; As soon as it went viral on social media, the police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.