कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:57 PM2021-07-19T15:57:13+5:302021-07-19T16:00:22+5:30

Heavy rain in Kalyan-Dombivali : वालधूनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे.

Heavy rain in Kalyan-Dombivali! Rains disrupted public life | कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी

googlenewsNext

कल्याण - कल्याणडोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. तसेच पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे वालधूनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. 

कोळेगाव परिरातील घरात पाणी शिरले. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरीकांना फूड पॅकेट वाटप करण्यात आली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी दिली आहे. कासा रिओ येथील नाला दुथडीभरुन वाहत आहे. त्याचबरोबर नांदिवली परिसरात पाणी शिरले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील महंमद अली चौक ते एसीपी कार्यालयार्पयत रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाजी चौकात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

कल्याण मुरबाड रोडवरील वरप, कांबा, म्हारळ या दरम्यान रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. कल्याण शीळ रस्त्यावरही पाणी साचले होते. या रस्त्यावरील रस्ते वाहतूकीला कोंडीचा सामना करावा लागला. कल्याण उल्हासनगर मार्गावरील वालधूनी रेल्वे उड्डाण पूलावर वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. 

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. ही अतिवृष्टी आहे. काल रात्रीपासून नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याच्या काही घटना सखल भागात घडल्या आहे. त्याठिकाणच्या नागरीकांना इतत्र हलविले जात आहे. त्यांना फूड पॅकेट पुरविण्याचे काम केले जात आहे. आज रात्री नऊ वाजता भरतीची वेळ आहे. पाऊस थांबला नाही तर भरतीच्या वेळी महापालिका प्रशासन लोलाईन एरियात जास्त लक्ष ठेवणार आहे. 
 

Web Title: Heavy rain in Kalyan-Dombivali! Rains disrupted public life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.