डान्सबारच्या नादाला लागला, उच्चशिक्षित बनला घरफाेड्या; ४७ ताेळे साेने हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:55 AM2023-04-13T06:55:26+5:302023-04-13T06:56:13+5:30
त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. यादरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला.
कल्याण :
त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. यादरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला. झटपट पैसा कमाविण्यासाठी ताे बंद घरे हेरून घरफाेड्या करायचा. ताे एकटाच असल्याने त्याला पकडण्यासाठी पाेलिसांना महिनाभर दमछाक करावी लागली. अखेरीस त्याला खडकपाडा पाेलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अटक केलेल्या चाेरट्याचे नाव राेशन जाधव असे आहे. पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाइल, लॅपटाॅप हस्तगत केला आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा.
कल्याणनजीक माेहने परिसरात एका चाेरट्याने घरफाेडी केली हाेती. या घरफाेडीत चाेरट्याने ३५ ताेळे साेन्याचे दागिने चाेरी केले हाेते. ज्या ठिकाणी ही चाेरी झाली त्या इमारतीत सीसीटीव्ही नसल्याने चाेरट्याला पकडण्याचे पाेलिसांपुढे आव्हान हाेते. पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, पाेलिस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.
पाेलिसांनी घटनास्थळापासून जवळपासचे सीसीटीव्ही तपासले सीसीटीव्हीच्या सहाय्याने चाेरटा राेशन याला अटक केली. त्याने माेहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर या भागात घरफाेडीचे आठ गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून पाेलिसांनी ४७ ताेळे साेने, लॅपटाॅप, माेबाइल हस्तगत केले आहेत.
दिवसा करायचा इमारतींची रेकी
- राेशन हा उच्चशिक्षित आहे. त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात तीन वर्षे काम केले. नाेकरीला असताना त्याला डान्सबारचा नाद लागला. डान्सबारमध्ये पैसा उडवायला ताे चाेरी करू लागला. चाेरी करण्यासाठी ताे दिवसा इमारतींची रेकी करायचा.
- ज्या इमारतीत वाॅचमन नाही. तसेच सीसीटीव्ही नाही. याची खात्री करून घ्यायचा. मात्र रात्री त्या इमारतीत जाऊन ताे घरफाेडी करायचा. अखेर ताे सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाेलिसांच्या जाळ्यात अडकला.