डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळावा हा दसरा मेळाव्याचा ट्रेलर; मंत्री दादा भुसे यांचे विधान
By मुरलीधर भवार | Published: September 23, 2022 09:36 PM2022-09-23T21:36:50+5:302022-09-23T21:37:05+5:30
कल्याण-न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. न्यायालयाचा निकाल एका अर्थाने योग्यच लागला असे मला वाटते. ...
कल्याण-न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. न्यायालयाचा निकाल एका अर्थाने योग्यच लागला असे मला वाटते. कारण नवी मुंबईपाठोपाठ डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळाव्यातील कार्यकत्र्याची अलोट गर्दी पाहता शिवाजी पार्क पुरले नसते. ही गर्दी दसरा मेळाळ्य़ाचा ट्रेलर आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क पेक्षा पाच पट मोठे मैदान घ्यावे लागेल. मुंबईत मैदान उपलब्ध न झाल्यास दसरा मेळावा ठाण्यात घ्यावा अथवा नाशिकमध्ये मेळाव्या घेण्याची मला संधी द्यावी अशी मागणी बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे केले.
डोंबिवलीतील पाटीदार भवन सभागृहात शिंदे गटाच्या वतीने हिंदू गर्व गजर्ना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, राजेस मोरे, दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच महिन्यात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतक:याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतक:यांना न्याय दिला गेला आहे. आज चारच शब्द सारखे ऐकविले जातात. गद्दार, पाठीत खंजीर खुपसला, बाप काढला, खोटारडे. बाळासाहेब माङो वडिल आहेत. त्याचा फोटो का लावला. मात्र मी सांगेन की, बाळासाहेब एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते. ते संपूर्ण शिवसेनेचे बाप होते. बाप काढणा:यांचे विचार संकुचित आहे अशी टिका भुसे यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
मेळाव्यास महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित असल्याने मंत्री भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीत महिलांसाठी मोठी भेट देणार आहे. पण ती काय भेट आहे याचा उलगडा त्यांनी न करता महिला वर्गाची उत्सुकता कायम ठेवली आहे.
फोटो व्हायरल करणा:यांना खासदारांचा टोला
ज्यांनी माझा फोटो व्हायरल केला. तो फोटो माङया ठाणे येथील घरातील आहे. मुख्यमंत्र्यांची व्हीसी असल्याने त्यामागे फलक लावला होता. मी नागरीकांना भेटण्यासाठी बसलो होते. आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ माझीही खुर्ची विरोधकांच्या डोळ्य़ात खूपू लागली आहे. म्हणचे आत्ता घरी बसण्याचीही चोरी झाली असे स्पष्ट केले.