१२०० सूर्यनमस्कार घालणाऱ्या महेश पाटील याचा सन्मान! नमस्कार मंडळ कल्याणचा उपक्रम
By अनिकेत घमंडी | Updated: February 12, 2024 18:23 IST2024-02-12T18:22:14+5:302024-02-12T18:23:16+5:30
आदित्य शिंदेला (९५५ नमस्कार) द्वितीय क्रमांक तर ऋषिकेश पाथरवटला (९१५ नमस्कार) तृतीय क्रमांक

१२०० सूर्यनमस्कार घालणाऱ्या महेश पाटील याचा सन्मान! नमस्कार मंडळ कल्याणचा उपक्रम
अनिकेत घमंडी, डोंबिवली: नमस्कार मंडळ कल्याणच्या वतीने शताब्दीनिमित्त कै गणेश हनुमान तथा बंडोपंत पुरोहित स्मृत्यर्थ अविरत १२०० सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक महेश पाटील १२०० नमस्कार, द्वितीय क्रमांक आदित्य शिंदे ९५५ नमस्कार, तृतीय क्रमांक ऋषिकेश पाथरवट ९१५ नमस्कार, उत्तेजनार्थ बक्षिसे हेरंब साने, ऋषिकेश साळुंखे, अपूर्व वणकउद्रे व पार्थ देशपांडे यांना देण्यात आली.
मुलींमध्ये, प्रथम क्रमांक गौरी शिंदे ८५० सूर्यनमस्कार, द्वितीय क्रमांक रोशनी गठडी ८०० सूर्यनमस्कार व तृतीय क्रमांक दिपाली थोरात हिने ७२० नमस्कार घातले. ५० वर्षा वरील स्पर्धेत प्रथम क्रमांक राम अभ्यंकर, द्वितीय क्रमांक राजेश दिक्षित व तृतीय क्रमांक राजन बहुलेकर यांनी मिळवला. सर्व विजेत्यांचे व सहभाग नोंदवणार्या स्पर्धकांचा मंडळातर्फे यथोचित गौरव करण्यात आल्याची माहीती रा स्व संघाचे स्वयंसेवक प्रवीण देशमुख यांनी दिली.