आमची दुकाने बेकायदा कशी ? कल्याणमधील संतप्त व्यापाऱ्यांचा केडीएमसीला सवाल

By मुरलीधर भवार | Published: March 15, 2023 07:26 PM2023-03-15T19:26:14+5:302023-03-15T19:26:28+5:30

कल्याण - कल्याण स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेल दरम्यान रस्ता रुंदीकरणात व्यापा:यांची दुकाने बाधित झाली. त्या ...

How are our shops illegal? Angry traders in Kalyan question KDMC | आमची दुकाने बेकायदा कशी ? कल्याणमधील संतप्त व्यापाऱ्यांचा केडीएमसीला सवाल

आमची दुकाने बेकायदा कशी ? कल्याणमधील संतप्त व्यापाऱ्यांचा केडीएमसीला सवाल

googlenewsNext

कल्याण-कल्याण स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेल दरम्यान रस्ता रुंदीकरणात व्यापा:यांची दुकाने बाधित झाली. त्या दुकानदारांना बेकायदा बांधकामास अधिन राहून तीन पट जास्तीचा मालमत्ता कर वसूलीच्या नोटिसा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या आहेत. या नोटिसांना व्यापारी वर्गान विरोध केला आहे. आमची दुकाने बेकायदा कशी असा सवाल उपस्थित केला आहे.

महापालिकेच्या वतीने तत्कालीन आयुक्त ई. रविंद्रन यांनी २०१५ साली शहरातील २३ रस्ते रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यापैकी छत्रपती शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेल दरम्यान रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यावेळी व्यापारी वर्गाकडून रुंदीकरणास विरोध केला गेला. मात्र आयुक्तांनी रुंदीकरणासाठी सहकार्य करा असे आवाहन केल्यावर व्यापा:यांचा रुंदीकरणासाठी विरोध कमी झाला. रस्त्याचे रुंदीकरण झाले. रस्ते रुंदीकरणात ज्या व्यापा:यांची दुकाने तोडली गेली. त्या तोडलेल्या जागेच्या बदल्यात त्यांनी वरच्या दिशेने दुकाने वाढवून घ्यावीत असे स्पष्ट करण्यात आले होते. दुकानदारांनी दुकाने वाढविली.

दुकानदारांनी रस्ते विकास कामाला सहकार्य केले. त्यांची दुकाने तोडली गेली. तेव्हा त्यांना त्या बदल्यात कोणताही आर्थिक मोबदला दिला गेला नाही. नुकसान भरपाई दिली गेली नाही. आत्ता त्यांनी वाढवी वरच्या दिशेने केलेले बांधकाम हे बेकायदा ठरवून बेकायदा बांधकामास अधिन राहून तीन पट जास्तीचा मालमत्ता कर लागू केला आहे. व्यापा:यांना नोटिसा पाठविल्या आहेत. या विषयावर व्यापारी संघटनेचे राकेश मुथा, हरीष खंडेलवाल यांच्या पुढाकाराने गोपाळकृष्ण हॉटेलच्या सभागृहात एक बैठक घेण्यात आली.

या बैठकीत व्यापारी वर्गाने महापालिकेच्या नोटिसला काय उत्तर द्यावे या विषयीची माहिती जागरुक नागरीक फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी दिली. लवकर व्यापारी वर्गाकडून महापालिकेच्या नोटिसला रितसर उत्तर दिले जाणार आहे. त्या उत्तरापश्चात महापालिका काय निर्णय घेते. त्यानंतर व्यापारी वर्गाकडून पुढचे पाऊल उचलले जाणार आहे.

Web Title: How are our shops illegal? Angry traders in Kalyan question KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण