"कूळ संरक्षित शेतकऱ्यांच्या जागेवर गुजराती कसे काय कूळ लावू शकतो?"
By मुरलीधर भवार | Published: October 19, 2023 04:14 PM2023-10-19T16:14:37+5:302023-10-19T16:15:23+5:30
आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांचा सवाल; 1 हजार कोटीची जमीन लाटणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर लढा उभा करणार
कल्याण - कूळ कायद्यानुसार जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असताना गुजराती येथे येऊन त्या जमीनीवर कूळ कसे लावून शकतो. हा ठाणे जिल्ह्यातील बुद्धीमतांचा आणि शेतकरी चळवळीचा अपमान आहे. या जमीनीचे मालक शेतकरी आहे. त्या जागेवर कूळ लावणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचा इशारा आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी दिला आहे.
कोळेगावातील ५३ एकर जमीनीवर बिल्डर आणि सावकारांनी शेतकऱ््यांच्या जमीनीवर कूळ लावून त्या जागा विकत घेण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे. या ५३ एकर जागेची किंमत आजच्या बाजारभाव मूल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भात आगरी समाजाचे नेते पाटील यांनी सांगितले की, १९५७ सालच्या कूळ कायद्यानुसार कूळ घोषित आहे. या कायद्यानुसार कोळेगावातील ५३ एकर जागेवर शेतकऱ््यांचे संरक्षित कूळ आहे. कूळ कायद्यानुसार ज्याचे कूळ आहे. तोच त्या जमीनीचा मालक आहे. असे असताना खोटे पेपर तयार करुन बिल्डर आणि सावकर हा जमीनीवर दावा कसा करु शकतो. या जमीनीवर कूळ लावून ही जमीन लाटण्या प्रकरणी प्रशासन, राजकीय नेते हे सावकार आणि बिल्डरांच्या पाठीशी आहेत. हा जमीन लाटण्याचा प्रकार आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कूळ कायद्याच्या जमीनी कोणाला घेता येत नाही. या प्रकरणी प्रशासनाच्या विरोेधात न्यायालयीन लढा दिला जाणार आहे.
आज आगरी नेते पाटील यांनी कोळेगावातील शेतकऱ््यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पाटील हे प्रत्यक्ष जागेवर गेले. त्याठीकाणी आधीच एक पोलिस अधिकारी तपासकामी आला होता. तो एका बिल्डरसोबत आला होता. त्याला शेतकऱ््यांनी जाब विचारला. तेव्हा पाेलिस अधिकाऱ्यांनी मला आडकाठी केल्यास सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. तेव्हा शेेतकऱ््यांनी मानपाडा पोलिसांना पाचारण केले. मानपाडा पोलिस येई पर्यंत शेतकऱ््यांनी बिल्डरसोबत आलेल्या पोलिस अधिकाऱ््यांची गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर तणाव कमी झाला. यावेळी शेतकऱ््यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत प्रशासनाचा विरोध केला.