गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:13 AM2023-05-22T08:13:25+5:302023-05-22T08:13:46+5:30

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात.

How to travel by train for Ganeshotsav, you tell...Check tickets :MLA Raju Patil | गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाले. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक नाही. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली असताना दलालांमुळे यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. या आरक्षित तिकिटांचा आढावा घ्यावा आणि कोकणवासीयांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकणवासीयांच्या कोकण प्रवासाचा ‘श्री गणेशा’ करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली. 

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. पहिल्याच दिवशी अवघ्या तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा आली. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. अद्याप रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने आमदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आमदार पाटील यांनी कोकणवासीयांच्या व्यथा मांडल्या आहेत. दरम्यान, दलालांमुळे चाकरमान्यांची कोकणची वाट आणखी बिकट होत चालली आहे. 

दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणा
रेल्वे मंत्रालय याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणा असून, परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. सर्व रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपतीनिमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून द्यावे आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. 

Web Title: How to travel by train for Ganeshotsav, you tell...Check tickets :MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.