शांतता-संवाद टिकविण्यासाठी कल्याणमध्ये मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 04:40 PM2022-05-01T16:40:57+5:302022-05-01T16:41:43+5:30

मानवी साखळीत सुहास कोते, मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, डॉ सुहास चौधरी, उत्तम जोगदंड, अनुप कुमार पाण्डेय, बाबा रामटेके, विशाल जाधव यांच्यासह अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते.

Human chain in Kalyan to maintain peace-dialogue | शांतता-संवाद टिकविण्यासाठी कल्याणमध्ये मानवी साखळी

शांतता-संवाद टिकविण्यासाठी कल्याणमध्ये मानवी साखळी

googlenewsNext

कल्याण- सध्याची परिस्थिती पाहता समाजात शांतता आणि परस्परांमध्ये संवाद टिकून राहण्यासाठी रविवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत येथील जागरूक नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळी केली होती. पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेल्या या मानवी साखळीमध्ये ना कुणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली की ना कुणाविरोधात बॅनरबाजी केली गेली. केवळ पांढरे शुभ्र कपडे आणि कोणताही मजकूर नसणारा पांढरा शुभ्र बॅनर हाती धरून एक आगळी वेगळी मानवी साखळी तयार करण्यात आली होती.

मानवी साखळीत सुहास कोते, मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, डॉ सुहास चौधरी, उत्तम जोगदंड, अनुप कुमार पाण्डेय, बाबा रामटेके, विशाल जाधव यांच्यासह अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते. सध्या जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तसेच समाजिक तणाव वाढवण्याचे प्रयत्न वाढत चालले आहेत. मात्र त्याच वेळेला सामाजिक बंधुभाव, शांतता, प्रेम आणि सहिष्णुता ही आपली सामाजिक मूल्ये असून समाजातील कोणताही प्रश्न सोडवण्याचा मार्ग हा परस्पर संवादाचा असतो, याला अनुसरून आम्ही हे शांततेच्या मार्गाने मानवी साखळी केल्याची माहिती कोते यांनी दिली. 

ही मानवी साखळी कोणत्याही संघटनेची ,पक्षाची किंवा व्यक्तीची नसून समाजातील प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणिव करुन देण्यासाठी तीचे आयोजन केल्याकडेही सहभागी नागरिकांकडून लक्ष वेधण्यात आले.
 

Web Title: Human chain in Kalyan to maintain peace-dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण